Prathamesh Parab
Prathamesh Parab Twitter/ @pprathameshp
मनोरंजन बातम्या

दगडू इज बॅक! 'टाइमपास'च्या प्रथमेश परबनं सांगितला धम्माल अनुभव, म्हणाला...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: 'हम काल है तो क्या हुआ दिलवाले है', आई बाबा आणि साई बाबा शप्पथ अशा अनेक वेगवेगळ्या तुफान ठरलेल्या संवादाने तयार झालेला टाइमपास. टाइमपासच्या सर्वच भागांनी प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचवले. टाइमपास, टाइमपास २ आता टाइमपास ३ ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ZEE5 भारतातील बहुभाषिक आणि चित्रपटांचा दर्जेदार आशय देणाऱ्या ओटीटीची ओळख आहे.

टाइमपासच्या यशस्वी तिसऱ्या भागाचे दिग्दर्शक रवी जाधव असून प्रमुख भूमिकेत प्रथमेश परब व हृता दुर्गुळे आहेत. ३६ टक्के मिळवून बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर दगडू कॉलेजमध्ये पाऊल टाकतो आणि मग पुढे काय घडते हे सिनेमा पाहिल्यावर कळेल. गुंड पार्श्वभूमी असलेला आपला भूतकाळ मागे टाकत दगडूची नवी सुरुवात करण्याचा निश्चय मित्रांची सोबत चुकल्याने आयुष्य पणाला लागते. आपण कधीच बदलणार नाही असं त्याला वाटते, मात्र तरीही पुढे जात राहाण्याचे बळ त्याच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडतो. तिचे नाव पालवी आहे. दगडूच्या सुसंस्कृत स्वभावाने पालवी प्रभावित होते, मात्र सगळ्याच चांगल्या गोष्टी कधी ना कधी संपतात या वाक्याप्रमाणे दगडूच्या स्वभावात बदल होतो. चित्रपटात संजय नार्वेकर, भाऊ कदम, वैभव मांगले या विनोदी कलाकारांच्या मुख्य भूमिकेत आहेत.

याविषयी अभिनेता प्रथमेश परब म्हणाला, ‘दगडूच्या मित्रांच्या गँगप्रमाणेच कॉलेजमध्ये माझीही गँग होती. फरक इतकाच होता, की दगडू इतरांचे सल्ले ऐकत बसतो आणि प्रत्यक्षात मी स्वतःचे निर्णय स्वतः घेतो. टाइमपास 3 चं शूटिंग करताना, दगडूची सिग्नेचर पोझ देताना, त्याचे धमाल पंचलाइन्स, जबरदस्त स्टारकास्ट, शिवाय निसर्गरम्य ठिकाणी रोमँटिक सीन्स करताना मला खूप मजा आली. टाइमपास 3 नं मला कित्येक आठवणी दिल्या आणि त्या कायम लक्षात राहातील.’

Edited By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उन्हाळ्यात प्या ही 5 पेय, Blood Sugar राहील नियंत्रणात

Pushpa Pushpa Song : ‘पुष्पा द रुल’मधलं पहिलं गाणं रिलीज, भन्नाट हूकस्टेप्स पाहून तुम्हीही थिरकाल

Sharad Pawar: PM मोदींकडून पंतप्रधानपदाची अप्रतिष्ठा; लोकांना मुद्द्यांपासून वळवण्याचे काम सुरू... शरद पवारांचे टीकास्त्र

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे यांची आज सांगलीत सभा

High Cholesterol Level: उच्च कोलेस्ट्रॉलमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका, मग आहारात करा बदल

SCROLL FOR NEXT