Tighee Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tighee Movie: आई–मुलींच्या नात्याची हळवी कहाणी; सोनाली कुलकर्णीच्या 'तिघी' चित्रपटातील नविन गाणं प्रदर्शित

Tighee Marathi Movie: मराठी चित्रपट 'तिघी'मधील भावस्पर्शी 'शारदा सरिता' गाणं प्रदर्शित. सोनाली कुलकर्णीच्या चित्रपटातून उलगडणार आई-मुलीच्या नात्याची हळवी कहाणी.

Shruti Vilas Kadam

Tighee Marathi Movie: तिघी या आगामी मराठी चित्रपटाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नात्यांची गुंतागुंत, भावनिक ओढाताण आणि स्त्रीमनाचा सूक्ष्म प्रवास मांडणारा हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटातील ‘हास जराशी’ या पहिल्या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता आणखी एक संवेदनशील आणि हळव्या भावनांना स्पर्श करणारे गाणे ‘शारदा सरिता’ प्रदर्शित झाले आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

आई आणि मुलीच्या नात्यातील न बोलल्या जाणाऱ्या भावना, आपुलकी, स्वीकार आणि हळवी ओढ ‘शारदा सरिता’ या गाण्यातून अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. प्रत्येक आईसाठी आणि प्रत्येक मुलीसाठी आपलेसे वाटणारे हे गाणे मनात शांतपणे उतरते. शब्दांचा गाजावाजा न करता, हळूच हृदयाला भिडणारी भावना या गीताचे वैशिष्ट्य ठरते.

या गाण्याचे गीतलेखन प्रतिभावान अभिनेता-कवी जितेंद्र जोशी यांनी केले असून संगीतकार निलेश मोहरीर यांनी दिलेले मृदू आणि प्रवाही सूर गाण्याच्या भावविश्वाला अधिक खोलवर नेतात. तसेच पार्श्वगायिका प्रियंका बर्वे यांच्या भावपूर्ण आवाजामुळे ‘शारदा सरिता’ला खास उंची मिळाली आहे. शब्द, सूर आणि गायन यांचा सुरेख संगम या गाण्यात अनुभवायला मिळतो.

गीतकार जितेंद्र जोशी म्हणतात की, ‘शारदा सरिता’ लिहिताना शब्दांपेक्षा भावनांची जुळवाजुळव अधिक महत्त्वाची होती. मोठ्या, ठळक भावना मांडण्याऐवजी मनात हळूच रुजणाऱ्या भावना शब्दांत उतरवण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते सांगतात. शब्द नदीसारखे शांतपणे वाहावेत, ही भावना मनात होती आणि त्यातूनच हे गाणे आकाराला आले.

चित्रपटाच्या दिग्दर्शिका जीजिविषा काळे यांच्या मते, ‘तिघी’ हा चित्रपट नात्यांच्या न बोलल्या जाणाऱ्या भावनांचा शोध घेणारा आहे. ‘शारदा सरिता’ हे गाणे केवळ कथानकाचा भाग नसून तो एक भावनिक प्रवास आहे, जो प्रेक्षकांना पात्रांच्या मनोविश्वाशी अधिक घट्ट जोडतो.

तिघी या चित्रपटात भारती आचरेकर यांच्यासह सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, भावनिक आणि संवेदनशील कथानकामुळे तो प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

SCROLL FOR NEXT