Tighee Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tighee Movie: आईचं घर आणि हजार आठवणी...; येत्या महिला दिनी उलगडणार 'तिघीं'च्या आयुष्यातलं ‘चौथं पान’!

Tighee Movie: आई-मुलींच्या नात्यात दडलेली गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिला दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित होणाऱ्या तिघी या चित्रपटातून स्त्रीमनाच्या प्रवासाची झलक पाहायला मिळणार आहे.

Shruti Vilas Kadam

Tighee Movie: सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा हृदयस्पर्शी आणि नात्यांच्या उबदार धाग्यांनी विणलेला चित्रपट येत्या महिला दिनी म्हणजेच ६ मार्च २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आई-मुलींच्या नात्यात दडलेल्या न सांगितलेल्या भावना, आठवणी आणि काही अंतर्मुख करणाऱ्या क्षणांवर आधारित ही कथा आहे. महिला दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून स्त्रीमनाच्या प्रवासाची झलक पाहायला मिळणार आहे.

तिघींच्या जगण्यातलं चौथं पान’ उलगडत असताना या तिघींमधलं नातं, त्यांचे आयुष्याकडे पाहाण्याचे दृष्टिकोन आणि बदलत्या काळातली भावनिक चढ-उतार यांचा सुंदर वेध दिग्दर्शिका जीजिविषा काळे यांनी घेतला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांच्यासह नेहा पेंडसे बायस व सोनाली कुलकर्णी या चित्रपटात दिसणार आहेत.

दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणतात, “‘तिघी’ हा आई-मुलींच्या नात्याचा चित्रपट असून त्यांच्या आतल्या आवाजांचा प्रवास आहे. आपण ज्या भावना दैनंदिन आयुष्यात व्यक्त करू शकत नाही, त्या सगळ्या या कथेतून उलगडतात. येत्या महिला दिनाच्या निमित्ताने हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत.’’

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जीजिविषा काळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती शार्दूल सिंह बायस, नेहा पेंडसे बायस, निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे यांनी केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शार्दूल सिंह बायस, नेहा पेंडसे बायस, निखिल महाजन पुन्हा एकदा एकत्र आल्याने प्रेक्षकांना काहीतरी भावस्पर्शा कलाकृती पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुन्हा एकदा विजयाची झळाळी! RCB दुसऱ्यांदा WPL चॅम्पियन; चौथ्यांदा दिल्लीचं स्वप्न भंगलं, फायनल हातातून निसटलं

रामदास कदम हप्तेखोर, डान्सबारमधून पैसे कमावतात; ठाकरेंच्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, VIDEO

रेल्वे स्टेशनवर भीषण स्फोट; अनेक लोक जखमी; टॅम्बोव परिसर हादरला, VIDEO

PM मोदी-राहुल गांधी संसदेत भिडले? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात मुंबईहून नागपूरकडे वाहतूक खोळंबली

SCROLL FOR NEXT