Tiger Shroff Firing SAAM TV
मनोरंजन बातम्या

Tiger Shroff Firing : "दिल्लीची बस चुकली आणि..."; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील ३ शूटर्सच्या अटकेमागची थरारक इनसाईड स्टोरी

Tiger Shroff Firing Accused Escape Plan Exposed : टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी पळून जाण्याचा प्लान आखला होता. मात्र पोलीसांनी तो उघड केला. शूटर्सच्या अटकेमागची थरारक इनसाईड स्टोरी जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबारानंतर आरोपींनी आखला पळून जाण्याचा प्लान

CCTV फुटेजमुळे पोलीसांनी घेतला आरोपींच्या हालचालींचा माग

जयपूरला पोहोचण्यापूर्वी कोटा रेल्वे स्थानकाजवळ तिघे पोलिसांच्या ताब्यात

साम टीव्ही प्रतिनिधी - साक्षी यादव

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार झाल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास घेत आहेत. या प्रकरणात मोठे अपडेट समोर आले आहेत. टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी पोलिसांपासून बचाव करण्यासाठी पळून जाण्याचा प्लान आखला. सुरतहून बसने दिल्लीला आणि त्यानंतर नेपाळमध्ये पळून जाण्याची त्यांची योजना होती. मात्र, दिल्लीची बस चुकल्याने आरोपींना आपला प्लान बदलावा लागला. मुंबई क्राइम ब्रँचच्या तपासातून आरोपींच्या हालचालींबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कथित मास्टरमाइंड अनिल पंडित याने अंकित खटकच्या माध्यमातून व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (VoIP) कॉलद्वारे आरोपींना सूचना दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर फुलसिंग, रेहान अन्सारी आणि हृतिक कुमार या तिघांनी ऑटो रिक्षाने सुरत रेल्वे स्थानक गाठले.

पुणे-जयपूर एक्स्प्रेसने प्रवास सुरू

आरोपींनी पहाटे १ वाजून ३३ मिनिटांनी पुणे-जयपूर एक्स्प्रेसने प्रवास सुरू केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांच्या तपासणीदरम्यान शस्त्रे सापडण्याची भीती असल्याने गोळीबारासाठी वापरलेली दोन शस्त्रे आणि काडतुसे सुरत बस स्थानकाजवळ लपवल्याचा आरोप आहे.जयपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच उतरून रस्तेमार्गे दिल्लीला जाण्याची त्यांचा प्लान होता. त्यानंतर नेपाळमध्ये पळून जाण्याचा त्यांचा कथित प्लान होता. मात्र, पोलिसांनी त्यांच्या हालचालींवर लक्ष होते.

CCTV फुटेजच्या मदतीने आरोपींचा माग

मुंबई क्राइम ब्रँचने सुरत बस स्थानक आणि रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेतला. मुंबई क्राइम ब्रँचकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे राजस्थान पोलिसांनी तिन्ही कथित शूटरना ताब्यात घेतले. जयपूरला पोहोचण्यापूर्वीच कोटा रेल्वे स्थानकाच्या बाहेरील परिसरात तिघांना अटक करण्यात आली. अटकेच्या वेळी आरोपींकडे केवळ पाच हजार रुपये असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या पैशांचा वापर दिल्ली आणि त्यानंतर नेपाळला जाण्यासाठी प्रवासखर्च म्हणून करण्याची त्यांची योजना असल्याचा आरोप आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पहाटेच्या सुमारास वाकड परिसरातील सहा सात दुकानांना लागली भीषण आग

Heart Health: फक्त जेवणाच्या ताटात या 4 पदार्थांचा करा समावेश; हार्ट अटॅकचा धोका जवळही येणार नाही

Ashok Chavan : अशोक चव्हाण भाजपसोडून काँग्रेसमध्ये घरवापसी करणार का? नाना पटोलेंच्या वक्तव्याने विषय संपला

Mumbai : मुंबई लोकलमध्ये पॉवर बँकचा अचानक स्फोट! बॅगला आग लागल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण

Island Forts : चारही बाजूंनी पाणी अन्...; बेटांवर असलेले जगातील ७ रहस्यमय किल्ले, भव्यता पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT