टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, आरोपी कुठले? नेपाळचा डाव कसा फसला? Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tiger Shroff Firing: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, आरोपी कुठले? नेपाळचा डाव कसा फसला?

Tiger Shroff Firing: टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्लीमार्गे नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना कोटा पोलिसांनी रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले.

Shruti Vilas Kadam

Tiger Shroff Firing: अभिनेता टायगर श्रॉफ फायरिंग केस प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपींनी दिल्लीमार्गे नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती कोटा सिटी पोलिसांनी दिली आहे. कोटा सिटीच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी गौतम यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोटा सिटी पोलिसांनी तातडीने कारवाई करत कोटा रेल्वे स्थानकावरून तिघांना ताब्यात घेतले.

कोटा रेल्वे स्थानकावरून तिघांना ताब्यात घेतले

टायगर श्रॉफ फायरिंग केस प्रकरणात आरोपी दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कोटा सिटी पोलिसांनी वेगाने कारवाई केली. त्यानंतर कोटा रेल्वे स्थानकावर कारवाई करून तिघांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात या तिघांचा नेमका काय संबंध होता याचा तपास सुरू आहे.

अनिल पंडितने रेहानशी साधला संपर्क?

कोटा सिटीच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल पंडित याने रेहानशी संपर्क साधून फायरिंगचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. रेहानने सोनीपत येथून एका अल्पवयीन मुलाला या कामाचा सुपारी दिली होती. त्यामुळे या प्रकरणातील कटाचे धागेदोरे वेगवेगळ्या ठिकाणांपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे.

फायरिंग प्रकरणाचा तपास

काल संध्याकाळी मुंबईतील जुहू परिसरात तीन अज्ञात व्यक्तींनी टायगर श्रॉफच्या कारवर दहा राऊंड गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे बॉलिवूडसह मुंबईत खळबळ उडाली आहे. सुदैवाने, या हल्ल्यात टायगर श्रॉफ सुरक्षित असून त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र, त्यासोबत असणाऱ्या चालक आणि एक रिक्षावाला गोळीबारात जखमी झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT