Tiger 3 Twitter Review Twitter
मनोरंजन बातम्या

Tiger 3 Twitter Review: सलमान- कॅटच्या ‘टायगर ३’ला चाहत्यांकडून अफलातून प्रतिसाद, सोशल मीडियावर चाहत्यांनी दिले इतके स्टार

Chetan Bodke

Tiger 3 Twitter Review

अखेर सलमान खानचा (Salman Khan) आज बहुप्रतिक्षित ‘टायगर ३’ (Tiger 3) चित्रपट रिलीज झाला आहे. गेल्या वर्षभरापासून प्रेक्षकांना या चित्रपटाची खूपच उत्सुकता होती. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हा चित्रपट रिलीज झाला आहे. जसे आपण कोणत्याही सणाची आतुरतेने वाट पाहतो, तशीच वाट सलमानचे चाहते त्याच्या चित्रपटाचीही वाट पाहतात. ‘टायगर ३’चे बऱ्याच ठिकाणी सकाळी ७ वाजल्यापासूनच शोची सुरुवात झाली आहे. अशातच प्रेक्षकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स X (ट्वीटर)वर सुद्धा चित्रपटाबद्दलची प्रतिक्रिया शेअर केली आहे. चला तर जाणून घेऊया, सलमान- कतरिनाचा ‘टायगर ३’ प्रेक्षकांना कसा वाटतोय ?

सलमान- कतरिनाच्या ‘टायगर ३’चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी सलमान खानच्या चाहत्यांनी चांगलीच गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. काही युजर्सने हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार अशी प्रतिक्रिया दिली आहे. एकाने चित्रपटाला चार स्टार दिलेले आहेत. सोबतच पुन्हा एकदा सलमान- कतरिनाने एकत्र स्क्रीन शेअर केल्यामुळे चाहते आनंदित दिसत आहेत.

कतरिना कैफने टॉवेल फाईट सीन खूप चांगल्या पद्धतीने केला आहे. इमरान हाश्मी ‘टायगर ३’चा खरा चेहरा आहे, त्याने चित्रपटामध्ये खूप सुंदर अभिनय केला आहे. सोबतच सलमान- कतरिनानेही आपल्या सिनेकारकिर्दीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. ‘सुलतान’पेक्षा सलमानने अफलातून काम केले आहे. असं म्हणत चाहत्यांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे.

तर आणखी एक युजर म्हणतो, ब्लॉकबस्टर सिनेमा, ॲक्शनपॅक सिनेमा, ट्वीस्ट असलेला सिनेमा, क्षणाक्षणाल सरप्राइजेस, देशभक्ती भावना, सेलिब्रिटींची दमदार एन्ट्री आणि अभूतपूर्व इंटरव्हल

सलमान खान चित्रपटाचा आत्मा, त्याचा अभिनय आणि एक्सप्रेशनने चित्रपटाला चार चॉंद लावले.

चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमधूनच अफलातून कमाई केलेली दिसत आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी १५ कोटींहून अधिक ॲडव्हान्स बुकिंगमध्ये पैसे कमवले आहेत. काही ट्रेड ॲनालिस्टनुसार चित्रपट ४० ते ५० कोटींच्या आसपास कमाई करण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अर्थात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा कमाईचा आकडा खूपच मोठा आहे. चित्रपट पहिल्याच दिवशी किती कोटींची ओपनिंग करतो, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

सलमान खान आणि कतरिना कैफची ‘टायगर ३’मधून चाहत्यांना जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे. चित्रपटामध्ये भाईजान अर्थात सलमान एजंट टायगरच्या भूमिकेत, तर बॉलिवूडची कॅट अर्थात कतरिना झोयाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर चित्रपटामध्ये प्रेक्षकांना सरप्राईज पॅकेट म्हणून इमरान हाश्मी सुद्धा पाहायला मिळणार आहे. तो चित्रपटामध्ये विलनची भूमिका साकारत आहे. ‘टायगर ३’मध्ये शाहरुख खान 'पठान'च्या भूमिकेत आणि हृतिक रोशन 'वार'मधील कबीरच्या भूमिकेत खास कॅमिओ करताना दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT