Tiger 3 3rd Day Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tiger 3 3rd Day Collection: भाईजानच्या ‘टायगर ३’ची बॉक्स ऑफिसवर झेप; ‘गदर २’ला मागे टाकत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Chetan Bodke

Tiger 3 3rd Day Box Office Collection

सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर स्पाय थ्रिलर ‘टायगर ३’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करीत आहे. चित्रपट दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अर्थात १२ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपट फक्त प्रेक्षकांनाच नाही तर समीक्षकांनाही हा चित्रपट खूप पसंदीस पडत आहे. सलमान-कतरिनाची ॲक्शन आणि इमरान हाश्मीचा ग्रे-शेडेड अवतार चाहत्यांच्या खूपच पसंतीस पडला आहे. ‘टायगर ३’च्या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडित काढले आहेत. चला तर जाणून घेणूया ‘टायगर ३’च्या कमाईबद्दल

‘टायगर ३’ ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ४४.५० कोटी तर दुसऱ्या दिवशी ५७.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. सलमान- कतरिनाचा ‘टायगर ३’ दिवाळीच्या शुभमुहूर्तावर रिलीज झाला असला तरी, चित्रपटाला ऐन सणामध्येही दिलासादायक प्रतिसाद मिळत आहे. ‘सॅकनिल्क’च्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘टायगर ३’ ने तिसऱ्या दिवशी ४२.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांतच १४६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘पठान’, ‘जवान’, ‘बाहुबली २’ सह अनेक चित्रपटांचे ‘टायगर ३’ ने रेकॉर्ड मोडित काढले. (Bollywood)

कमाईच्या बाबतीत सलमान- कतरिनाच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धमाका केला आहे. ‘टायगर ३’च्या कमाईचा वेग पाहता, सलमान- कतरिनाच्या फिल्मी करिअरमधील दमदार कमाई करणारा चित्रपट किंवा सर्वाधिक हिट चित्रपट ठरण्याची शक्यता आहे. सलमान-कतरिनाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार, म्हटल्यावर त्यांचे फॅन्स एखाद्या सणासारखा जल्लोष करतात. देशभरातील सर्व थिएटरमध्ये सध्या जल्लोषाचे वातावरण आहे.

‘टायगर ३’मधील सलमान खानच्या ढांसू एन्ट्रीपासून ते कतरिना कैफच्या जबरदस्त अ‍ॅक्शनपर्यंत सर्वकाही ‘टायगर ३’ मध्ये पाहायला मिळत आहे. इमरान हाश्मीने त्याच्या ग्रे-शेडेड अवताराने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. ‘टायगर ३’मध्ये सलमान खानच्या अ‍ॅक्शनसोबतच शाहरुख खान आणि हृतिक रोशनचाही कॅमिओ पाहायला मिळत आहेत. ‘टायगर ३’चे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले असून चित्रपटाचे लेखन आदित्य चोप्राने केले आहे. सध्या सगळीकडे ‘टायगर ३’या चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

SCROLL FOR NEXT