Tiger 3 Box Office Collection Day 2 Instagram @beingsalmankhan
मनोरंजन बातम्या

Tiger 3 2nd Day Collection: भाईजानच्या ‘टायगर ३’ चा बॉक्स ऑफिसवर डबल धमाका; दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Chetan Bodke

Tiger 3 Box Office Collection Day 2

सलमान खान (Salman Khan), कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि इमरान हाश्मी (Imran Hashmi) प्रमुख भूमिकेत असलेला ‘टायगर ३’ (Tiger 3) चित्रपट दिवाळीच्या शुभमुहूर्तावर रिलीज झाला आहे. चित्रपटाची प्रदर्शनाच्या आधीपासूनच चांगलीच चर्चा होत आहे. सध्या सोशल मीडियावर थिएटरमधील अनेक व्हिडीओज व्हायरल होताना दिसत आहेत. प्रेक्षकांकडून चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळत असून चित्रपटाने दुसऱ्या दिवशी उत्तम कमाई केली आहे.

बहुप्रतिक्षित स्पाय थ्रिलर ‘टायगर ३’ने पहिल्या दिवशी ४४.५० कोटींची कमाई केली आहे. सॅकल्निकच्या अहवालानुसार, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ५७. ५० कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने अप्रतिम कामगिरी केली आहे. चित्रपटाने एकट्या भारतामध्ये १०२ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने दुसऱ्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा गाठल्यामुळे सध्या सर्वत्र चित्रपटाचे कौतुक होत आहे. (Bollywood)

‘टायगर ३’ने दुसऱ्या दिवशी ‘सर्वाधिक कमाई’ करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या दिवसाच्या कमाईत ‘टायगर ३’ने ‘जवान’ आणि ‘गदर २’ला मागे टाकत आपले नाव कोरले आहे. दुसऱ्या दिवशी पठान ७०.५० कोटी, टायगर ३- ५७.५० कोटी, जवान- ५० कोटी, गदर २- ४३. ८ कोटी चित्रपटांनी अशी जबरदस्त कमाई केली आहे.

कमाईच्या बाबतीत सलमान- कतरिनाच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धमाका केला आहे. ‘टायगर ३’च्या कमाईचा वेग पाहता, सलमान- कतरिनाच्या फिल्मी करिअरमधील दमदार कमाई करणारा चित्रपट किंवा सर्वाधिक हिट चित्रपट ठरण्याची शक्यता आहे.

सलमान-कतरिनाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे, म्हटल्यावर त्यांचे फॅन्स एखाद्या सणासारखा जल्लोष करतात. देशभरातील सर्व थिएटरमध्ये सध्या जल्लोषाचे वातावरण आहे. ‘टायगर ३’मधील सलमान खानच्या ढांसू एन्ट्रीपासून ते कतरिना कैफच्या जबरदस्त अ‍ॅक्शनपर्यंत सर्वकाही ‘टायगर ३’ मध्ये पाहायला मिळत आहे.

इमरान हाश्मीने त्याच्या ग्रे-शेडेड अवताराने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. ‘टायगर ३’मध्ये सलमान खानच्या अ‍ॅक्शनसोबतच शाहरुख खान आणि हृतिक रोशनचाही कॅमिओ पाहायला मिळत आहेत. ‘टायगर ३’चे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले असून चित्रपटाचे लेखन आदित्य चोप्राने केले आहे. सध्या सगळीकडे ‘टायगर ३’या चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

SCROLL FOR NEXT