Pathan Will Screen In Kashmir : काश्मीरमध्ये शाहरुखची हवा! नव्या थिएटर्समध्ये झळकणार 'पठान'

Shah Rukh Khan Movies : शाहरुख खान अभिनीत पठान हा या दोन नवीन थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Pathan Will Screen In Kashmir's New Theater
Pathan Will Screen In Kashmir's New TheaterSaam Tv
Published On

Pathan Movie Will Screen In New Theaters In Kashmir : काश्मीर अनेक दशकांपासून अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. मात्र, 1990 मध्ये दहशतवाद वाढल्यानंतर राज्यातील चित्रपटगृहे बंद करण्यात आली. गेल्या वर्षी आयनॉक्सने 20 सप्टेंबर रोजी श्रीनगरमध्ये पहिले-वहिले मल्टिप्लेक्स सुरू केल्यानंतर परिस्थिती सुधारली.

दरम्यान 18 सप्टेंबर 2022 रोजी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी पुलवामा आणि शोपियान जिल्ह्यात असलेल्या बहुउद्देशीय सिनेमा हॉलचे उद्घाटन केले. जादूज नावाची कंपनी या सभागृहांचे देखरेख करत आहे.

Pathan Will Screen In Kashmir's New Theater
Kajol Breaks In The Trial : आम्हाला संकोच वाटला नाही.. २९ वर्षांनी काजोलने मोडली नो-किसिंग पॉलिसी ; सहकलाकाराने शेअर केला शूटिंगचा अनुभव

14 जुलै रोजी मनोज सिन्हा यांनी अशाच प्रकारे बारामुल्ला आणि हंदवाडा येथे आणखी दोन बहुउद्देशीय सिनेमा हॉलचे उद्घाटन केले. पुलवामा आणि शोपियान चित्रपटगृहांप्रमाणेच, नव्याने उघडलेली ही थिएटर्सही जादूझद्वारे चालवली जातील. या थिएटर्समध्ये कॅफे, कॉन्फरन्स आणि सेमिनारची सुविधा असेल. वृत्तानुसार, दोन्ही थिएटर्स 100 आसनी आहेत. (Latest Entertainment News)

शाहरुख खान अभिनीत पठान हा या दोन नवीन थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट असल्याचेही समोर आले आहे.

बारामुल्ला थिएटरचे उद्घाटन करताना मनोज सिन्हा यांचा व्हिडिओ समोर आला आहे. हे थिएटर पूर्वीच्या शेरवानी कम्युनिटी हॉलमध्ये सुरू करण्यात आले आहे. पठानचे पोस्टर थिएटरच्या उद्घाटनाच्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये पाहिले जाऊ शकते.

Pathan Will Screen In Kashmir's New Theater
TV Actress On Casting Couch : कोल्ड ड्रिंकमधून ड्रग्ज दिलं अन्... अभिनेत्री रतन राजपूतने शेअर केला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव

पठानसोबतच, शाहरुख खानचा पुढचा चित्रपट, जवान आणि सनी देओलचा गदर 2 चे पोस्टर्स देखील पाहता येतील, यावरून असे सूचित होते की हे दोन बहुप्रतिक्षित चित्रपट देखील या नवीन सिनेमागृहात झळकणार आहेत.

शाहरुख खान व्यतिरिक्त पठानमध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही भूमिका होत्या. बॉलिवूडमधील आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणार हा चित्रपट आहे, ज्याने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 500 कोटी आणि जगभरात जवळपास 1000 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

काश्मीरमध्ये चित्रपटगृहे उघडण्यामागील सरकारची कल्पना राज्यात मनोरंजनाच्या पर्यायांचा विस्तार करणे आणि ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर परिस्थिती सर्वसामान्य करणे या त्यांचा उद्देश आहे.

गेल्या वर्षी, S S राजामौलीचा RRR (2022) हा पुलवामा आणि शोपियांच्या थिएटरमध्ये जवळपास तीन दशकांनंतर काश्मीरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ठरला. यानंतर आमिर खानचा लाल सिंग चड्ढा (२०२२), जो आयनॉक्स श्रीनगरच्या उद्घाटनाच्या दिवशी दाखविण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com