Mahhi Vij  Saam Tv
मनोरंजन बातम्या

या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीला बलात्काराच्या धमक्या

जय भानुशालीची पत्नी माही विज हिला रस्त्यावर बलात्काराची उघड धमकी देण्यात आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: प्रसिद्ध टीव्ही होस्ट, बॉलीवूड अभिनेता आणि माजी बिग बॉस स्पर्धक जय भानुशालीची पत्नी माही विज हिला रस्त्यावर बलात्काराची उघड धमकी (Threat) मिळाली आहे. जयची पत्नी स्वतः एक अभिनेत्री (Actress) आहे, पण लग्नानंतर तिने अभिनय करणे सोडून दिले आहे, आणि मुलांचे संगोपन सुरू केले. परंतु, ती सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून आपली उपस्थिती नोंदवत असते.

हे देखील पाहा-

माहीने व्हिडिओ शेअर केला आहे

अभिनेत्री माही विजने नुकताच तिच्या ट्विटर (Twitter) अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि हा व्हिडिओ (Video) शेअर करताना अभिनेत्रीने सांगितले की, एका व्यक्तीने तिला मध्येच थांबवले आणि तिला शिवीगाळच केली, नाहीतर बलात्काराची धमकीही दिली आहे. त्याने या व्हिडिओमध्ये मुंबई (Mumbai) पोलिसांनाही टॅग केले असून स्वत:साठी मदतीची याचना केली आहे. माही विजचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मुंबई पोलिसांकडून मदत मागितली

माही विजने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये फक्त एक वाहनाची नंबर प्लेट दिसत असून काही लोकांचा आवाज येत आहे. हा व्हिडिओ फक्त ४ सेकंदांचा आहे. अभिनेत्रीने मुंबई पोलिसांना टॅग करत म्हटलं आहे की, आम्हाला धमकी देणाऱ्या या व्यक्तीला शोधण्यात मला मदत करा. माहीच्या या ट्विटला मुंबई पोलिसांनी उत्तर दिले आहे. तुम्ही जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती देत ​​तक्रार नोंदवा, असे त्यांनी लिहिले आहे.

माही विज आणि जय भानुशाली हे टेलिव्हिजन जगतातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर जोडपे मानले जाते. माही विज लग्नानंतर टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर होती, पण तिने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. याशिवाय कलर्सच्या 'लागी तुझसे लगन' आणि 'नकुशा' या शोमधून तिला खरी ओळख मिळाली. माही विजने 'झलक दिखला जा-४' आणि 'नच बलिए-५' मध्ये देखील भाग घेतला आहे आणि आता ती लवकरच 'बिग बॉस १६' मध्येही दिसणार असल्याचे समजत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

SCROLL FOR NEXT