Sohail Khan- Seema Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

२४ वर्षांच्या संसारानंतर सीमा सजदेहने सोहेल खान सोबत का घेतला घटस्फोट? केला खळबळजनक खुलासा

सोहेलपासून घटस्पोट घेतल्यानंतर सीमा पहिल्यांदाच या विषयावर सविस्तरपणे बोलली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक पॉवर कपल्सचे डीवोर्स झाले आहे. त्यापैकी एक म्हणजे सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल खान(Sohail Khan) आणि त्याची पत्नी सीमा सजदेह(Seema Sajdeh). सोहेल आणि सीमाने लग्नाच्या २४ वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. याच वर्षी दोघांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला. अर्ज दाखल केल्यानंतर लगेचच सीमाने पती सोहेलचे आडनाव काढून टाकले. दोघांनीही त्यांच्या घटस्फोटाचे खरे कारण अद्याप सांगितलं नव्हते. दरम्यान, सोहेलपासून घटस्पोट घेतल्यानंतर सीमा पहिल्यांदाच या विषयावर सविस्तरपणे बोलली आहे.

सीमा सजदेहने एका मुलाखतीत सोहेल खानसोबतच्या घटस्फोटाबाबत सांगितले आहे. ती म्हणाली, 'जर मी चिखलात पडले असते तर मी खोल गडद खड्ड्यात बुडू शकते. म्हणूनच मला इतर मार्गाने बाहेर पडणे गरजेचे आह. हीच शिकवण मला आयुष्यात पुढे नेत आहे.'

सीमा पुढे म्हणाली, 'तुमची मुले, तुमचे कुटुंबातील सदस्य, भाऊ, बहिणी कोणीही तुम्हाला दुखात पाहू शकत नाही. तुम्हाला त्या व्यक्तीची सतत काळजी असते ज्यावर तुमचे प्रेम असते. त्यामुळे मी माझ्या आयुष्याकडे पूर्णपणे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे. माझ्याकडे असलेल्या सर्व नकारात्मक गोष्टी मी सोडून दिल्या. तसेच, मला असे वाटते की मी अशा टप्प्यावर पोहोचलो आहे, जिथे मला आता कोणाचीही पर्वा नाही. ज्या लोकांना मी कोण आहे हे माहीत आहे त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझे कुटुंब, माझे आई-वडील, माझी मुले आणि माझी भावंडे माझ्यासोबत कायम आहेत. माझ्यासाठी एवढाचं पुरेस आहे. मला स्वतःशी प्रामाणिक राहायचे आहे. खरे सांगायचे तर आता माझ्याकडे काहीच नाही आहे.'

सोहेल आणि सीमा वेगळे झाले असतील, पण १९९८ मध्ये दोघांनीही कुटुंबाच्या विरोधात जाऊन मंदिरात लग्न केले होते. वेगवेगळ्या धर्मामुळे त्यांचे कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हते, त्यामुळे दोघांनीही घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले होते. आता दोघांना योहान आणि निर्वाण ही दोन मुले आहेत.

सध्या सीमा सजदेह लवकरच 'फेब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज' या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत महीप कपूर, भावना पांडे आणि नीलम कोठारी देखील दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spicy curry chutney: जेवताना तोंडी लावायला काहीतरी हवंय? मग १० मिनिटात बनवा ही झणझणीत कडीपत्त्याची चटणी

Crime: बाप बनला हैवान! झोपलेल्या मुलीच्या गळ्यावरून ब्लेड फिरवलं, नंतर बायकोवर चाकू हल्ला; मुंबई हादरली

Maharashtra Live News Update : शितल तेजवानी पोलिसांना सहकार्य करत नसल्याची माहिती समोर

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट! महापालिका निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंचा 'वेगळा' निर्णय

Shocking : नगरमध्ये खळबळजनक घटना, ९ वीच्या मुलीला ‘तलब जिहाद’मध्ये अडकवण्याचा प्रयत्न, महिला शिक्षिकेचा प्रताप उघड

SCROLL FOR NEXT