karan johar , deepika padukone and katrina kaif saam tv
मनोरंजन बातम्या

Koffee With Karan 7: दीपिका, कतरिनावर करण जोहर नाराज; कारण आलं समोर

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा' 'कॉफी विथ करण' हा शो नेहमीच चर्चेत असतो. या शोचा ७ वा सीझन सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Koffee With Karan 7 |मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा' 'कॉफी विथ करण'(Koffee With Karan) हा शो नेहमीच चर्चेत असतो. या शोचा ७ वा सीझन सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. अलीकडेच या शोचा नवीन भाग प्रसारित झाला आहे. ज्यामध्ये सोनम कपूर(Sonam Kapoor) आणि अर्जुन कपूर सहभागी झाले होते. दरम्यान, या शोचा होस्ट करण जोहर दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफवर नाराज असल्याचे वृत्त समोर आले आहे. या दोन्ही अभिनेत्रींवरील करणच्या रागाचे कारणही तसेच आहे. दीपिका आणि कतरिनाचा बदला घेण्यासाठी करण लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

करण जोहर 'कॉफी विथ करण' या लोकप्रिय शोचा ७वा सीझन होस्ट करत आहे. सर्व सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबत अनेक खुलासे होत असतात. पण यावेळी करण जोहरने आपण लग्न करण्याचा विचार करत असल्याचा मोठा खुलासा केला आहे. बदला घेण्यासाठी त्याला लग्न करायचे असल्याचे त्याने या भागात सांगितले आहे.

परंतु, करण जोहर त्याच्या लग्नाच्या कोणत्याही समारंभात, ज्यांनी त्याला लग्नाचे आमंत्रण दिले नाही, त्यांना आमंत्रित करणार नाही. त्याने कोणाचेही नाव घेतले नसले तरी करण दीपिका आणि कतरिनावर नाराज असल्याचे मीडिया रिपोर्ट्समधून सांगितले जात आहे.

दीपिका पदुकोणने २०१८ साली इटलीमध्ये अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्न केले होते. तर कतरिना कैफने २०२१ साली राजस्थानमध्ये अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केले होते. पण या दोन्ही अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नात करण जोहरला आमंत्रित केले नव्हते. या अभिनेत्रींच्या लग्नाला फक्त जवळचे लोक आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. म्हणूनच करण जोहर लग्न करणार असेल तर, तो त्याच्या लग्नाला या अभिनेत्रींना बोलावणार नसल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

Shocking: बायकोचं शिर धडावेगळं केलं, नंतर शरिराचे १७ तुकडे करत...; आयुष्यभर साथ देण्याचं वचन देणाऱ्या नवऱ्याचा क्रूर चेहरा समोर

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT