Payad Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Payad Marathi Movie : मराठी चित्रपटाचा जगात डंका; जगप्रसिद्ध 'फोर्ब्स मॅगझिन'ने घेतली 'पल्याड'ची दखल

'फोर्ब्स' या जगप्रसिद्ध अमेरिकेतील मासिकेने 'पल्याड' या मराठी चित्रपटाची दखल घेतली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सध्या अनेक चित्रपटांचे नाव गाजत आहे. तसेच अनेक भारतीय चित्रपट जगभरातील पुरस्कारांवर आपले नाव कोरत आहेत. 'फोर्ब्स'(Forbes Magazine) या जगप्रसिद्ध अमेरिकेतील मासिकेने 'पल्याड'(Payad) या मराठी चित्रपटाची दखल घेतली आहे. यामुळे पुन्हा एकदा मराठी चित्रपटाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 'फोर्ब्स'या आंतरराष्ट्रीय मासिकेने दिग्दर्शक शैलेश दुपारेची चित्रपटासंबंधित घेतलेली मुलाखत त्यांच्या ऑनलाईन वेबपोर्टल तसेच मासिकेतही प्रसिद्ध केली आहे. 'फोर्ब्स'सारख्या आंतरराष्ट्रीय मासिकेने एका मराठी चित्रपटाची दखल घेणे हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी मानाची गोष्ट आहे.

'पल्याड' चित्रपटाचे चित्रीकरण चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील काही गावांमध्ये झाले असून अवघ्या २५ दिवसात या चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात आले आहे. चंद्रपुरातील व्हिजनरी व्यावसायिक व निर्माते पवन सादमवार, सुरज सादमवार, मंगेश दुपारे, प्रणोती पांचाळ आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी एलिवेट फिल्म्स व एलिवेट लाईफ आणि लावण्य प्रिया आर्टसच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शैलेश दुपारे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून के सेरा सेरा या डिस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून येत्या ४ नोव्हेंबरला 'पल्याड' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

'पल्याड' चित्रपटाने आजवर दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल नवी दिल्ली, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल सिक्कीम, अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिव्हल मुंबई, नवी दिल्ली फिल्म फेस्टिव्हल, ब्लॅक स्वान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल कोलकाता, कोकण मराठी चित्रपट महोत्सव अशा अनेक मानाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये विविध पुरस्कार पटकावले आहेत. याखेरीज सिनेक्वेस्ट व्हीआर अँड फिल्म फेस्टिव्हल यूएसए, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ साऊथ एशिया टोरंटो, कॅलेला फिल्म फेस्टिव्हल स्पेन, इंटरनॅशनल कॅास्मोपॅालिटन फिल्म फेस्टिव्हल टोक्यो, एशिया आर्ट फिल्म फेस्टिव्हल हाँगकाँग, बॉयडन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल स्वीडन आणि रिचमंड इंटरनॅशनल फिल्म फस्टिव्हल युसएमध्ये चित्रपटाची अधिकृत निवड करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

SCROLL FOR NEXT