Thank God Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Thank God Movie: कॉमेडीच्या तडक्यासह माणुसकीची शिकवण; अजय देवगणचा 'थॅंक गॉड' २५ ऑक्टोबरला होणार रिलीज

अजय देवगणच्या 'थॅंक गॉड' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा कालच 'थॅंक गॉड' या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. त्याच्या पोस्टवर प्रेक्षक कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. आज अजय देवगणच्या 'थॅंक गॉड' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अजय देवगणसोबत (Ajay Devgan) मुख्य भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अजय चित्रगुप्तच्या मुख्य भूमिकेत असून अजय देवगण या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'गेम ऑफ लाईफ' खेळणार आहेत.

ट्रेलरमध्ये नोरा फतेही दिसत आहे. तिच्या ग्लॅमरस लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहेत. सिद्धार्थच्या ही भूमिकेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. सिद्धार्थ एका सामान्य मुलाची भूमिका सकारात आहे. ज्याच्यासोबत चित्रगुप्त हा गेम ऑफ लाईफ खेळणार आहे. त्याच्यासोबत घडणाऱ्या अनेक वाईट गोष्टी टाळण्यासाठी चित्रगुप्त प्रयत्न करत आहे.

चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, अशोक ठाकरे, सुनीर खेतरपाल, दीपक मुकुट, आनंद पंडित आणि मार्कंड अधिकारी असून सहनिर्माते यश शाह आहेत. इंद्र कुमार दिग्दर्शित चित्रपट २५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येनार आहे. सिद्धार्थने आणि अजयने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. चाहत्यांनी दोघांनाही चित्रपटासाठी भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care: वजन कमी करायचंय? मग रोज संध्याकाळी ७ वाजता जेवण्याची सवय लावा; मिळतील 'हे' फायदे

Parenting Tips : मुलं सतत मोबाईलमध्ये गुंतलेली असतात? स्क्रीनटाईम कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय

धक्कादायक पण दुर्मिळ घटना! जन्मत: दात असलेलं 1 किलोचं बाळ! मुंबईत डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

Maharashtra News Live Update: खालापूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात गर्भवती महिलेला झोळीचा आधार

महिनाभर गोड खाणं बंद केलं तर शरीरात काय बदल होतील?

SCROLL FOR NEXT