Kajol Devgan Web Series Trailer Instagram
मनोरंजन बातम्या

The Trial Trailer: तडफदार वकील असलेल्या काजोलचा ‘द ट्रायल-प्यार, कानून, धोका’चा ट्रेलर प्रदर्शित

Kajol Devgan Web Series Trailer: अभिनेत्री काजोल देवगण ‘द ट्रायल-प्यार, कानून, धोका’ या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर डेब्यू करत आहे.

Chetan Bodke

The Trial Trailer Share: अभिनेत्री काजोल देवगण लवकरच ओटीटीवर डेब्यू करत आहे. सध्या तिच्या आगामी वेब सीरिजची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. तिने या वेबसीरिजचे प्रमोशन वेगळ्याच प्रकारे केल्यामुळे ती सोशल मीडियावर तुफान ट्रोल झाली होती. लवकरच काजोलची ‘द ट्रायल-प्यार, कानून, धोका’ ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे. नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून वेब सीरिजची बरीच चर्चा सुरू आहे.

काजोलने या वेबसीरिजमध्ये नोयोनिका सेनगुप्ता नावाचे पात्र साकारले असून ट्रेलर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ट्रेलरमध्ये, नोयोनिका सेनगुप्ताचे पती, अतिरिक्त न्यायाधीश राजीव सेनगुप्ता यांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात येते. न्यायाधीश राजीव सेनगुप्ता यांनी लाच म्हणून लैंगिक संबंधांची मागणी केली होती. (Bollywood Film)

पतीला अटक झाल्याने आपल्यासह दोन मुलींची जबाबदारी देखील नोयोनिका यांच्यावर आली. त्या पेशाने वकील, मुलींची जबाबदारी खांद्यावर आल्यामुळे पुन्हा एकदा वकील म्हणून कामावर रुजू होऊन आपला प्रवास सुरू करते. कालांतराने पती नोयोनिकाकडे त्याची केस लढण्याची विनंती करतो, असे सर्व ट्रेलरमध्ये दाखवले. (Entertainment News)

ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची ताणली असून वेब सीरिजची कथा प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवते. काजोलसह इतर सेलिब्रिटींचा अभिनय देखील प्रेक्षकांना फारच आवडला आहे. नेहमीच पेक्षा काही तरी वेगळ्या भूमिकेत अभिनेत्रीला पाहायला मिळाल्याने चाहते तिची वेब सीरिज पाहण्यासाठी उत्सुक आहेत. येत्या ४ जुलैला ही वेबसीरिज प्रदर्शित होणार असून येत्या काळातच आपल्याला वेब सीरिजबद्दलचा उलगडा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: सरकारने काढलेला GR कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही: मुख्यमंत्र्यांचे विधान

Shirdi Sai Sansthan : साई मंदिर सुरक्षेसाठी आता AI चा वापर; साई संस्थानला तातडीने मिळणार गुन्हेगारांचा अलर्ट, डेटा होणार संग्रहित

Saiyaara OTT Release: थिएटर गाजवल्यानंतर अहान पांडे आणि अनीत पड्डाचा 'सैयारा' चित्रपट 'या' OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

Mumbai Metro 2: डायमंड गार्डन – मंडाले मेट्रो लवकरच धावणार, ५.३९ किमीचा मार्ग अन् ५ स्थानके; कधीपासून सुरू होणार?

बीडमध्ये चाललंय काय? वसतिगृहातील चिमुकल्यांना धुवायला लावले कपडे अन् बाथरूमची सफाई | VIDEO

SCROLL FOR NEXT