Yashoda Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Yashoda Teaser : समंथा दिसणार प्रेग्नंट लेडीच्या भूमिकेत; अ‍ॅक्शन, थ्रिलर, सस्पेंसने भरलेला 'यशोदा'चा टीझर लॉन्च

समंथा रुथ प्रभूच्या आगामी 'यशोदा' या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : साउथ सिनेसृष्टीतील ऊ अंटावा गर्ल समंथा रुथ प्रभूच्या(Samantha Ruth Prabhu) आगामी 'यशोदा'(Yashoda) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला असून हा टीझर पाहिल्यानंतर या चित्रपटाविषयी लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. चित्रपटाची कथा एका गर्भवती महिलेवर आधारित आहे, जिची भूमिका समंथाने साकारली आहे.

टीझरची सुरुवात समंथापासून होते, जिला डॉक्टर सांगतात की ती गरोदर आहे आणि तिला काय काळजी घ्यावी लागेल. या दृश्यादरम्यान आणखी बरेच शॉट्स देखील दिसत आहेत, ते पाहून असे दिसते की कोणीतरी समंथाचा पाठलाग करत आहे. हे दृश्य खूप भीतीदायक आणि सस्पेन्सने भरलेले आहेत. गरोदर महिलेच्या आयुष्यात होणारा गोंधळ पाहून कोणालाही भीती वाटू शकते.

समंथाचा चित्रपट मुख्यत्वे तेलुगूमध्ये बनला आहे, परंतु तो हिंदीसह इतर भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला समंथाचा पहिला बॉलिवूड डेब्यू चित्रपट म्हणता येणार नाही, पण हिंदीत डब केलेला हा तिचा पहिला चित्रपट आहे.

समंथा आता केवळ दाक्षिणात्य नाही तर संपूर्ण देशभरातील आवडती अभिनेत्री बनली आहे. तिचा हा चित्रपट सिनेप्रेमींसाठी एक सरप्राईज गिफ्ट आहे. तसेच या चित्रपटाचा टीझर पाहून देशभरातील प्रेक्षकांना सिनेमागृहांकडे खेचण्यात यश मिळेल असे वाटते.

हरी आणि हरीश यांनी एकत्रितपणे समंथा रुथ प्रभूच्या 'यशोदा'चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटामध्ये वरलक्ष्मी सरथकुमार आणि उन्नी मुकुंदन हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यात समंथाचा अॅक्शन अवतारही पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी हा चित्रपट यावर्षीच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. तेव्हा यशोदासोबत सस्पेन्स-थ्रिलरने भरलेल्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी चाहते उत्साही आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP च्या आंदोलनादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'फॉर्म ७' च्या नियमांत सुधारणा

Maharashtra News Live Update: मुंबईमधील आंदोलनात CJP च्या समर्थकांची धरपकड

Home Hacks : प्लॅस्टिकची बादलीवरील खार्‍या पाण्याचे डाग काढण्याचे सोपे घरगुती उपाय

5 Gram Gold Mangalsutra Designs: महिलांसाठी 5 ग्रॅम मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाइन्स, ऑफिस आणि डेलीवेअरसाठी एकदम बेस्ट

अभिजीत दिपकेनं ज्याच्यावर जंतरमंतरवरील CJP आंदोलनाची धुरा सोपवली तो अजिंक्य शिंदे कोण? अलिबाग कनेक्शन आलं समोर

SCROLL FOR NEXT