Dwayne Johnson  Instagram @therock
मनोरंजन बातम्या

The Rock Mother: 'द रॉक'च्या आईच्या कारला अपघात, अभिनेत्याने कारचे फोटो केले शेअर

हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉन्सनच्या आईच्या कारला अपघात.

Pooja Dange

The Rock Mother Accident : हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉन्सन याने नुकताच त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्याने शेअर केलेला फोटो एका कार अपघाताचा आहे. फोटो पाहून तुम्हला ड्वेन जॉन्सनचा अपघात झाला आहे असे वाटू शकते. परंतु ही दुर्घटना त्याच्यासोबत झालेली नसून त्याच्या आईसोबत झाली आहे.

हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉन्सनच्या आईच्या कारला अपघात झाला आहे. त्यानंतर ड्वेनने इन्स्टाग्रामवर दुरावस्था झालेल्या कारचा फोटो शेअर केला. तसेच सांगि"ही स्त्री फुफ्फुसाच्या कर्करोगापासून वाचली आहे, एक कठीण विवाह, दारूच्या नशेत ड्रायव्हरने मारलेली धडक आणि आत्महत्येचा प्रयत्न अशा विविध भयावह संकटातून बचावली आहे.

ड्वेन जॉन्सन म्हणजेच 'द रॉक'ने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या आईच्या कारचा दुरावस्थेतील फोटो शेअर करत कॅप्शन देत म्हटले आहे की, 'देवाचे आभार! ती ठीक आहे. काल रात्री कार अपघात झाला असताना माझ्या आईवर दयेच्या देवदूतांचे लक्ष पडले. ती बचावली आणि या धक्क्यातून सावरत आहे.

ही महिला (रॉकची आई) फुफ्फुसाचा कर्करोग, वाईट लग्न, मद्यधुंद ड्रायव्हरशी टक्कर आणि आत्महत्येचा प्रयत्न यातून वाचली आहे. देवदूत आणि चमत्कार खरे असतात हे यातून मला समजले. LAPD आणि LAFD तुम्ही खूप काळजी आणि तिच्यावर लक्ष दिले त्याबद्दल तुमचे आभार. फोनवर उपलब्ध राहिल्याबद्दल आणि या सर्वांद्वारे माझ्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद.

रॉकने या पोस्टच्या माध्यमातून त्याच्या आईची व्यथा सांगितली आहे. तसेच तिला मदत करणाऱ्यांचे आभार मानले आहे. रॉकच्या आईचा प्रकृती आता बारी आहे. हे जाणून रॉकच्या फॅन्सनी देखील सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

''रॉक' बऱ्याच काळापासून WWE रिंगमध्ये दिसलेला नाही. या वर्षी तो पुरुषांच्या रॉयल रंबल सामन्यात उतरेल, असे बोलले जात होते पण तसे झाले नाही. रेसलमेनिया ३९ मधील स्पर्धांचा सामना द रॉकशी होणार असल्याचेही बोलले जात आहे. आता हे सुद्धा कठीण वाटत आहे. मॅनिया येथे रोमन रेन्सचा सामना कोडी रोड्सशी होईल. या सामन्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

SCROLL FOR NEXT