Dream Girl 2 Get Postponed Saam TV
मनोरंजन बातम्या

Dream Girl 2 Movie Postponed: आयुष्मान खुरानाच्या चित्रपटाला काय मुहूर्त मिळेना; चौथ्यांदा बदलली चित्रपट प्रदर्शनाची तारीख

Ayushmann Khurrana Starrer Dream Girl 2 Postponed: आयुष्मानचा ड्रीम गर्ल हा चित्रपट अनेक मोठ्या चित्रपटांमुळे रखडला आहे.

Pooja Dange

Ayushmann Khurrana Dream Girl 2 Get Postponed: अभिनेता आयुष्मान खुरानाचा 'ड्रीम गर्ल' हा चित्रपट हिट झा होता. या चित्रपटाच्या सिक्वेलची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. 'ड्रीम गर्ल' चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हा आयुष्मानच्या आवाजाची क्रेझ निर्माण झाली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १४२ कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला होता. चार वर्षपूर्वी आलेला या चित्रपटाच्या सिक्वेलची गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये घोषणा करण्यात आली होती. तसेच हा चित्रपट ७ जुलैला प्रदर्शित होणार होता.

रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे की, चित्रपटाचे व्हिएफक्स आणखी चांगले करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. चित्रपटामध्ये आयुष्मान पुन्हा एकदा 'पूजा'चा गेटअप करून मुलगी बनणार आहे. आयुष्मानच्या लूकमध्ये कोणतीही कमतरता राहू यासाठी निर्मात्या पुरेपूर काळजी घेत आहेत. म्हणूनच 'व्हीएफक्स'चा वापर करून आयुष्मान साकारत असलेल्या 'पूजाचे कॅरेक्टर अजून चांगले बनवण्याचे काम सुरू आहे.

आयुष्मानने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये एक नोट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आयुष्मानचा पूजाच्या लूकमधील पाठमोरा फोटो आहे. तर त्या नोटमध्ये लिहिले आहे की, चार वर्षांनंतर तुमच्या हृदयाचा टेलिफोन पुन्हा वाजेल. आता याची तयारीही शानदार आणि धमाकेदार; आणि स्मूच असलेली हवी ना, बरोबर? त्यामुळे अजून थोडा वेळ थांबा आणि खूप प्रेम पाठवत रहा. 'आता 7 च्या साथीने नाही तर , 25 ऑगस्टला पूजा येईल!' म्हणजे 'ड्रीम गर्ल 2' आता 25 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

आयुष्मानचा ड्रीम गर्ल हा चित्रपट अनेक मोठ्या चित्रपटांमुळे रखडला आहे. ड्रीम गर्ल चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या चार वेळा तारखा बदलल्या आहेत. सप्टेंबर २०२२ला या चित्रपटाची घोषणा झाली होती. तर २९ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु या दिवशी कार्तिक साऱ्यांचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

त्यानंतर ड्रीम गर्ल चित्रपटाची तारीख पुन्हा बदलून एका आठवडाआधी चित्रपट प्रदर्शित करण्याचं ठरविण्यात आले. तर चित्रपट २३ जूनला प्रदर्शित होणार असे सांगण्यात आले. परंतु फेब्रुवारीमध्ये चित्रपटाची तारीख पुन्हा बदलून ७ जुलै करण्यात आली. करम मार्चमध्ये घोषणा करण्यात आली की अजय देवगणचा 'मैदान' चित्रपट २३ जूनला प्रदर्शित होणार आहे.

त्यानंतर आता चित्रपटाची तारीख २५ ऑगस्ट करण्यात आली आहे. या दिवशी देखील ड्रीम गर्ल आणि करण जोहरच्या नव्या चित्रपटाचा क्लॅश होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mallika Sherawat : मल्लिका शेरावत 'बिग बॉस 19'मध्ये सहभागी होणार का? स्वतःच केला खुलासा

Maharashtra Live News Update : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या घरी ईडीची धाड; १२ ठिकाणी छापेमारी

ऑफिसमध्ये घुसला अन् अंदाधुंद गोळीबार, स्वत:वरही झाडल्या गोळ्या, ५ जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: रेव्ह पार्टीचा खरा सूत्रधार कोण? ठाकरेंनी अग्रलेखात थेट 'या' भाजप नेत्याचं नाव घेतलं

Maharashtra Rain Update : हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर ओसरणार! | VIDEO

SCROLL FOR NEXT