Shah Rukh Khan Saam TV
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: #BoycottShahRukhKhan सोशल मीडियावर ट्रेंड होण्यामागचं खरं कारण आलं समोर

इमरान खान यांच्याबरोबर शाहरुखचा फोटो व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान त्याच्या आगामी पठाण या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या कचाट्यात सापडला आहे. अशात आता सोशल मीडियावर अचानक #BoycottShahRukhKhan हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. अनेकांना पठाण हा चित्रपट हॅशटॅगसाठी कारणीभूत असावा असे वाटत आहे. मात्र या हॅशटॅग मागचे खरे कारण काही वेगळेच आहे. (Latest Marathi News)

सोशल मीडियावर शाहरुखच्या पठाण चित्रपटासह त्याचा एक फोटो देखील व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून चाहते संतापले आहेत. त्यामुळेच शाहरुखला बॉयकॉट केलं जात आहे. हा फोटो पाहून चाहते इतके संतापले आहेत की, काही जण शाहरुखचा पुढचा एकही चित्रपट पाहायचा नाही असं म्हणत आहेत.

इमरान खान यांच्याबरोबर शाहरुखचा फोटो व्हायरल

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी सीएनएन वृत्त वाहिनीला मुलाखत दिली होती. यावेळी संपूर्ण जगाने तालिबानला मदत करायला हवी असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. तालिबानला मदत करून पाकिस्तान भारताच्या विरोधात आणखीन मजबूत होणार असे त्यावेळी काही जाणकारांनी म्हटले.

अशात आता सोशल मीडियावर इमरान खान यांच्याबरोबर शाहरुखचा फोटो व्हायरल होत असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अनेकांना वाटत आहे की, शाहरुख देखील इमरान खान यांचे समर्थन करत आहे.

साल २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या झिरो या चित्रपटानंतर शाहरुख ३ वर्षे रुपेरी पडद्यारपासून दूर आहे. साल २०२३ मध्ये त्याचा पठाण हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र चित्रपटाच्या (Movie) गाण्यानेच मोठा वाद सुरु झाला आहे. दीपिकाने या गाण्यात भगव्या रंगाची बिकीनी घातल्याने या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

एकीकडे चित्रपट आणि दुसरीकडे व्हायरल होत असलेल्या फोटोने शाहरुखला ट्रोल केलं जात आहे. मात्र इमरान खान यांच्याबरोबर शाहरुखचा जो फोटो व्हायरल (viral) होत आहे तो फार जुना असल्याचे समजले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT