Koffee with Karan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Koffee With Karan Season 8 | 'कॉफी विथ करण'चा सीझन 8 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; बॉलिवूडमधील अनेक सिक्रेट्स उलगडणार

कॉफी विथ करण लोकप्रिय चॅट शो चा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : 'कॉफी विथ करण'(koffee With Karan) शोच्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. कॉफी विथ करण लोकप्रिय चॅट शो चा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच 'कॉफी विथ करण ८'ची घोषणा करण्यात आली आहे. परंतु, सातवा हंगामा संपला असे नाही. त्याचे प्रक्षेपण अजूनही सुरू आहे. परंतु डिस्ने प्लस हॉटस्टारने नवीन सीझनची घोषणा केली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो प्रसारित होतं आहे.

२००४ ते २०१९ या कालावधीत 'कॉफी विथ करण'चे सहा सीझन स्टार वर्ल्ड वाहिनीवर प्रसारित झाले. सध्या या शोच्या ७ व्या सीझनची ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रिमिंग सुरू आहे. 'कॉफी विथ करण'च्या आठव्या सीझनची घोषणा जागतिक डिस्ने फॅन इव्हेंट 'डी२३ एक्स्पो २०२२' मध्ये आणखी दोन शोसह करण्यात आली. यामध्ये 'शोटाइम' आणि 'महाभारत' या शोचा देखील समावेश आहे. ज्याचे डिस्ने प्लस हॉटस्टारवर देखील प्रक्षेपण केले जाणार आहे.

डिस्ने प्लस हॉटस्टार आणि एचएसएम एंटरटेनमेंट नेटवर्कचे गौरव बॅनर्जी म्हणाले,'डी२३ एक्स्पो २०२२' सारख्या जागतिक स्तरावर नावाजलेल्या प्लॅटफॉर्ममध्ये आगामी सीझनची घोषणा होणे ही खूप आनंदाची बाब आहे. लवकरच कॉफी विथ करणचा आगामी सीझन लॉन्च होत आहे. कॉफी विथ करण ८' शोसह 'शोटाइम', 'महाभारत' या शोसाठी देखील मी खूप आनंदी आहे.

करण जोहर 'कॉफी विथ करण'च्या आगामी सीझनची घोषणा झाल्यामुळे आणि डिस्ने प्लस हॉटस्टारसोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. सध्या या शोचा सातवा सीझन जोरदार सुरू आहे. आतापर्यंत एकाहून एक दिग्गज सेलिब्रिटींनी यात सामील होऊन अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. प्रेक्षकांना मनोरंजनाचा पुरेपूर डोस मिळाला आहे. आता पुढील भाग देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी निर्माते सज्ज झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT