Siddharth Jadhav Saam Tv
मनोरंजन बातम्या

Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधव आठवडाभरापासून होता रुग्णालयात; सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

मराठी चित्रपटसृष्टीतील 'मोस्ट एनर्जिटिक पर्सन' सिद्धार्थ जाधव हा गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात अॅडमिट होता. नुकताच त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव(Siddharth jadhav) याने अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान पक्कं केलं आहे. मागील काही दिवसांत सिद्धार्थचे एकापेक्षा एक चित्रपट प्रदर्शित झाले आहे. तमाशा लाईव्ह, दे धक्का २ या त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांनीही भरभरून प्रतिसाद दिला. सध्या सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. फोटो, व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना त्याच्याविषयीच्या अपडेट देत असतो. मात्र नुकतीच सिद्धार्थने एक पोस्ट(Social Media) सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही पोस्ट वाचून चाहत्यांच्याही हृदयाचा ठोका चुकला असेल.

मराठी चित्रपटसृष्टीतील 'मोस्ट एनर्जिटिक पर्सन' सिद्धार्थ जाधव हा गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात अॅडमिट होता. नुकताच त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या तो घरी आहे. स्वत: सिद्धार्थने याबाबतची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.

सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रूग्णालयातील फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये त्याच्या हातात हिंदुजा रूग्णालयातील पट्टी दिसते आहे. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शन लिहिली आहे. 'नमस्कार.. गेला आठवडाभर मी हिंदुजा हॉस्पीटलमध्ये दाखल होतो.. आज घरी आलो..सर्वांचे मनापासून आभार. हिंदुजा हॅास्पीटलच्या स्टाफचेही खूप खूप आभार. माझी मनापासून काळजी घेतली त्याबद्दल. अभिनव महाडीक दादा आणि त्यांची संपूर्ण टीम... एका फोनवर नेहमीच धावून येणारे अमेय खोपकर दादा... शंशाक नागवेकर दादा लव्ह यू ऑलवेज,' असं सिद्धार्थने म्हटले असून, सगळ्यांचेच आभार मानले आहेत.

यावेळी सिद्धार्थने सगळ्यांनाच प्रकृतीकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. 'मी आता हळूहळू बरा होतो आहे. खूप धावपळ असते आपली. मात्र त्यातही स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होणार नाही याची कृपया काळजी घ्या, असं त्यानं म्हटलं आहे.

दरम्यान, सिद्धार्थ रुग्णालयात का दाखल झाला होता? याबाबत सिद्धार्थने आपल्या पोस्टमध्ये काहीही उल्लेख केला नाही. मात्र सिद्धार्थच्या या पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा : अमोल कोल्हे

Filmmaker Death: प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांचे ५७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

SCROLL FOR NEXT