Anupam Kher : काश्मिरी पंडितांच्या हत्येनंतर अनुपम खेर म्हणाले, प्रत्येकालाच...

जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनांवर बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Anupam Kher
Anupam KherSaam Tv
Published On

मुंबई: जम्मू-काश्मीरमध्ये(jammu-kashmir) काश्मिरी पंडितांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनांवर बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर(Anupam Kher) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरमध्ये आजही पंडितांच्या हत्या केल्या जात आहेत. काश्मिरी पंडितांवर ३० वर्षांपासून हल्ले होत आहेत. काश्मिरी पंडितांबद्दलचा दृष्टिकोन, विचार बदलले पाहिजेत. काश्मीर फाइल्सच्या माध्यमातून लोकांनी त्यांना होणार त्रास समजून घेतला. आम्ही चित्रपट तयार केला. त्यामुळे लोकांच्या मनातील वेदना जाग्या झाल्या. बरेचसे लोक आता म्हणू लागलेत की अनुपम खेर आता कुठे आहेत? असं ते म्हणाले.

Anupam Kher
Koffee With Karan 7 : काही इन्फ्लुएन्सर्स विमानतळावर जातात, पण...; उर्फी जावेदवर निशाणा

काश्मिरी पंडितांसोबत आजही अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, ही बाब खूपच लज्जास्पद आहे. काश्मिरी पंडितच काय, ते तर आपली लोकंही मारत आहेत. जे हिंदुस्तानला पाठिंबा देत आहेत, त्यांनाही ते मारत आहेत. याचा निषेध करावा तितका कमी आहे, असे अनुपम खेर म्हणाले.

Anupam Kher
Bipasha Basu Announce Pregnancy : बिपाशा-करणच्या घरी येणार नवा पाहुणा; बोल्ड पोस्टमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा

किती लोकांना सुरक्षा दिली जाऊ शकते? लोकांची मानसिकताच बदलली पाहिजे. जे निरागस आहेत, त्यांचा काहीच दोष नाही, अशा लोकांसाठी माझा जीव तीळतीळ तुटतो. एक टक्का असे लोक तिथे आहेत, जे आपला उदरनिर्वाह कसा करता येईल याचा प्रयत्न करत आहेत. कदाचित दहशतवाद्यांचे मनपरिवर्तन होईल, अशी त्यांना आशा आहे. पण ते बदलू शकत नाहीत, असेही अनुपम खेर म्हणाले.

अनुपम खेर काय म्हणाले?

काश्मीर फाइल्स या चित्रपटावरून काही लोक माझ्यावर आणि विवेक अग्निहोत्रीवर टीका करत होते. आम्ही हा चित्रपट तयार केला म्हणून त्यांच्या वेदना समजल्या. त्या लोकांना काश्मिरी हिंदू आणि पंडितांवरील अत्याचार दिसले. या हत्यांच्या घटना त्या टीका करणाऱ्यांना तोंडघशी पाडणाऱ्या आहेत, जे काश्मीर फाइल्स हा चित्रपट काल्पनिक असल्याचे सांगत होते. पाच लाख लोकांना त्यांच्या घरांतून बाहेर काढले होते, पण असे होऊ शकत नाही, असे त्यांच्याबाबत बोलले जायचे. त्यांच्यासारखे पाखंडी लोक मी आयुष्यात कधीच पाहिले नाहीत, अशी उद्विग्नताही अनुपम खेर यांनी बोलून दाखवली. दहशतवादी कधीच यशस्वी होणार नाहीत, कारण स्वातंत्र्यदिनी काय झालं हे बघितलं असेलच. काश्मीर खोऱ्यात जितका विकास होईल, तितके हे लोक चक्रावून जातील, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com