The Keral Story Teaser
The Keral Story Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

The Keral Story: 'त्या' ३२,००० महिलांची 'द केरळ स्टोरी', हृदयद्रावक टीझर पाहिलात का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

The Keral Story Teaser: बहुचर्चित ' द कश्मिर फाईल्स' (The Kashmir Files) चित्रपटाने संपूर्ण भारतभर अनेक कोटींचा गल्ला जमवला. चित्रपटाने चांगलेच यश संपादन करत अनेक मानाचे तुरे रोवले. चित्रपटात १९९० काळात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची कथा चित्रित झालेली आहे. कश्मिर फाईल्स चित्रपटासारखा एक नवा विषय पुन्हा एकदा चित्रपटाच्या माध्यमातून दिसणार आहे. (Bollywood Film)

विपुल अमृतलाल शाह निर्मित एक नवा विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. ' द केरळ स्टोरी' (The Keral Story) चित्रपटाची पहिल्या दिवशी घोषणा झाल्यापासून बराच चर्चेत आहे. चित्रपटात केरळ राज्यात बेपत्ता झालेल्या ३२,००० महिलांची कथा चित्रित करण्यात आली आहे. (Bollywood Latest Movie)

चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित असून चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सत्यघटनेवर आधारित असलेल्या चित्रपटाने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. चित्रपटाची निर्मिती विपुल शाह यांनी केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांचे आहे. चित्रपट दहशतवादी संघटनेने केलेल्या महिलांच्या तस्करीची सत्यता दाखवून देत आहे.

चित्रपटाच्या साध्या आणि सिंपल टीझरने एका महिलेची हृदयद्रावक कथा दाखवली आहे. त्या महिलेच्या भूमिकेत अदा शर्मा आहेत. नर्स बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले असते, पण तिचे अपहरण होते. त्या महिलेचे धर्मांतर करून तिला आयएसआयएस दहशतवादी म्हणून अफगाणिस्तानमध्ये जेरबंद करण्यात येते.

अशी ती एकटीच महिला नाही तर तब्बल ३२,००० महिलांना असे धर्मांतर करत त्यांना आयएसआयएस संघटनेत दहशतवादी म्हणून अफगाणिस्तानमध्ये जेरबंद करण्यात आले होते, असा खुलासा ती टीझरमध्ये स्वतः करते.

२००९ पासून केरळ आणि बंगळुरूमधील हिंदू आणि ख्रिश्चन समुदायातील सुमारे ३२,००० मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले असून, त्यापैकी बहुतांश सिरिया, अफगाणिस्तान आशा देशात आणि इतर आयएसआयएस सारख्या संघटनेत आहेत. या महिलांची वेदनादायक आणि सत्य कथा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नरेंद्र मोदींची पुण्यात सभा, अमित ठाकरे सभेसाठी रवाना

Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का; मालोजीराजे छत्रपतींना विश्वास, Video

Nashik Loksabha: नाशिक लोकसभेत मोठा ट्वीस्ट! शांतीगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून भरला अर्ज

Video: Abhijeet Patil भाजपला मदत करणार? फडणवीसांच्या भेटीनंतरचं उत्तर चर्चेत!

SCROLL FOR NEXT