Avatar: The Way of Water Box Office Collection  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Avatar: The Way of Water: 'अवतार द वे ऑफ वॉटर' भारतात अजूनही यशस्वी घोडदौड सुरुच, अनेक रेकॉर्ड काढले मोडित...

भारतात 'अवतार द वे ऑफ वॉटर' चित्रपटाचे कलेक्शन 353.95 कोटींवर पोहोचले होते.

Chetan Bodke

Avatar: The Way Of Water Box Office Collection: जेम्स कॅमेरॉन निर्मित आणि दिग्दर्शित 'अवतार द वे ऑफ वॉटर' या चित्रपटाने प्रदर्शनानंतर तीन आठवड्यांतच जगभरात 14060 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. भारतातही सर्वाधिक कमाई करणार्‍या हॉलिवूड चित्रपटाचाही त्याने मान पटकावला आहे. चित्रपटाचे देशातील एकूण कलेक्शन 454 कोटी रुपये इतके आहे. चित्रपटाची एकूण कमाई 373.25 कोटींच्या पुढे गेली आहे.

या कमाईने तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम' या हॉलिवूड चित्रपटाच्या 372.22 कोटींच्या एकूण कमाईला मागे टाकले आहे. चित्रपटाने भारतात दिलासादायक कामगिरी केली आहे. विशेषतः या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला उत्तर भारतीय प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. देशात आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या सर्व भाषांमधील चित्रपटांच्या यादीतही तो आठव्या क्रमांकावर आहे.

'अवतार द वे ऑफ वॉटर' हा चित्रपट प्रदर्शित होऊन चार आठवडे पुर्ण झाले आहेत. सोमवारी या चित्रपटाने शानदार २५ दिवस पूर्ण केले. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार या चित्रपटाने भारतात प्रदर्शनाच्या चौथ्या शुक्रवारी सुमारे 4 कोटी रुपये, चौथ्या शनिवारी 6.05 कोटी रुपये आणि चौथ्या रविवारी सुमारे 8.50 कोटी रुपये कमावले आहेत. रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 193.60 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाच्या तिकिटांच्या किमतीत घट होऊनही बॉक्स ऑफिसवर कायम आहे.

तिसऱ्या आठवड्यापर्यंत भारतात 'अवतार द वे ऑफ वॉटर' चित्रपटाचे कलेक्शन 353.95 कोटींवर पोहोचले होते. या कालावधीत चित्रपटाने इंग्रजीमध्ये 187.23 कोटी रुपये, हिंदीमध्ये 116.13 कोटी रुपये, तेलगूमध्ये 27.27 कोटी रुपये आणि तामिळमध्ये 17.30 कोटी रुपये कमावले आहेत.

आठवड्यानुसार कमाईच्या तुलनेत 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम' चित्रपटाला मागे टाकून दुसऱ्या आठवड्यात एकूण 100.50 कोटी रुपयांची कमाई करत चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही दीर्घकाळ शर्यतीत राहण्याची चिन्हं दर्शविली. चौथ्या वीकेंडपर्यंत या चित्रपटाने हिंदीत जवळपास 120 कोटींची कमाई केली आहे.

भारतात रिलीज झालेले टॉप 5 हॉलीवूड चित्रपट म्हणजे, अवतार द वे ऑफ वॉटर (२०२२) ३७३.२५ कोटी रु., अॅव्हेंजर्स एंडगेम (२०१९) ३७३.२२ कोटी रु., अ‍ॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर (२०१८) २२७.४३ कोटी रु, स्पायडर मॅन नो वे होम (२०२१) २१८.४१ कोटी रु आणि द जंगल बुक (२०१६) १८८ कोटींची कमाई या चित्रपटाने थिएटरमध्ये केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT