Gadar 2 Scene In Gurudwara: सनी देओलच्या ब्लॉकबस्टर चित्रपट गदरचा सीक्वल लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वाद सुरूवात झाली आहे. अलीकडेच शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) चित्रपटातील एका सीनवर आक्षेप घेतला होता. चित्रपटातील अभिनेता आणि दिग्दर्शकावर कारवाई करण्याची मागणीही एसजीपीसीने केली आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी याबाबत खुलासा केला आहे.
अनिल शर्मा यांनी ट्विटरवर एक स्टेटमेंट पोस्ट केले आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की मला कोणाच्याही धार्मिक भावना दुखवायच्या नव्हत्या. तसेच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, चंदीगड गुरुद्वारा साहिबमध्ये गदर 2 च्या शूटबद्दल काहीजणांच्या मनात काही गैरसमज आहेत. त्याबद्दल मी माझे स्पष्टीकरण सादर करत आहे.. "सब धर्म सम्भाव, सब धर्म सद्भाव" हा मी शिकलो धडा आहे आणि हा आमच्या गदर २च्या टीमचा मंत्र आहे. (Latest Entertainment News)
पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले दृश्य गुरुद्वाराच्या बाहेरील भागात शूट करण्यात आले आहे. मी आणि माझे संपूर्ण युनिट सर्व धर्माच्या भावनांचा आदर करतो. आमचा कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही, पण असे झाले असेल. कोणी दुखावले असेल तर त्यांची मी माफी मागतो.
गुरुद्वारामध्ये चित्रित झालेल्या गदर 2 मधील एका दृश्यावर एसजीपीसीचा आक्षेप आहे. या सीनमध्ये सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मागे उभे असलेले लोकही त्यांना चिअर करताना दिसत आहेत.
एसजीपीसीचे सरचिटणीस गुरचरण सिंग ग्रेवाल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आणि म्हटले आहे की, सनी देओल गुरुद्वाराच्या परिसरात अशा दृश्याचे चित्रीकरण करत आहे. दोघेही अशा पोझेस देत आहेत जे कोणत्याही परिस्थितीत गुरुद्वारामध्ये होऊ नये.
गदर २ ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी गदर: एक प्रेमकथा पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येणार आहे. ९ जून हा चित्रपत्र आपल्याला पुन्हा नव्याने पाहता येणार आहे. तर पुन्हा प्रदर्शित होणार हा चित्रपट 4K असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.