Darling Movie Poster and teaser Released Saam Tv
मनोरंजन बातम्या

Darlings Teaser: आलिया भट्टनं शेअर केला 'डार्लिंग्ज'चा फर्स्ट लूक, म्हणाली...

आलिया भट्टच्या प्रोडक्शनमधील डेब्यू चित्रपट 'डार्लिंग्स'चा फर्स्ट लुक आणि टीझर आज रिलीज करण्यात आले आहेत. टीझरमध्ये आलिया भट्ट, शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू यांचा अभिनय पाहून प्रेक्षक खूश झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जी आता हॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे ती म्हणजे आलिया भट्ट. अभिनेत्री आलिया भट्ट(Alia Bhatt) आता हॉलिवूडसोबतच निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करणार आहे. आलिया भट्टच्या प्रोडक्शनचा पहिला चित्रपट 'डार्लिंग्स' नेटफ्लिक्सवर रीलीज होणार आहे. (Netfilx)नेटफ्लिक्स इंडियाने आज चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि टीझर रिलीज केला आहे. त्याचवेळी आलियानेही तिच्या सोशल मीडिया हँडलवरून तिचा लूक आणि टीझर शेअर करून तिच्या लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. टीझर शेअर करताना आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हा फक्त टीझर आहे डार्लिंग्स.. ५ ऑगस्ट रोजी येत आहे #डार्लिंग्ज ऑन नेटफ्लिक्स

'डार्लिंग्स' चित्रपटाचा टीझर एका मिनिटाचा आहे. पण निर्मात्यांनी आलिया भट्टपासून ते शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यूपर्यंत चित्रपटातील सर्व कलाकारांना खूप उत्तम प्रकारे सादर केले आहे.

टीझरच्या सुरुवातीला आलिया बेडूक आणि विंचवाची गोष्ट सांगत आहे. याच वेळी सर्व पात्रांची ओळख करून दिली जाते. टीझरच्या शेवटी आलिया-शेफाली पोलिसांसमोर एक खून झाल्याचे सांगतात. मात्र, आई आणि मुलीच्या बोलण्यात एवढा गोंधळ आहे की, पोलीस अधिकारीही गोंधळतात आणि त्याचं म्हणणं खोट ठरवतात.

बेडूक आणि विंचू कधी मित्र होऊ शकतात का?

टीझर व्यतिरिक्त नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट केलेल्या पोस्टरमध्ये 'बेडूक आणि विंचू मित्र होऊ शकतात का? पाहा फक्त नेटफ्लिक्सवर डार्लिंग्ज, ५ ऑगस्ट अशी कॅप्शन लिहिली आहे

आलिया भट्ट 'डार्लिंग्स'मधून निर्माती क्षेत्रात नव्याने पदार्पण करणार आहे. जसमीत के. रीन दिग्दर्शित, शाहरुख खान आणि गौरी खानच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंटसोबत आलिया भट्ट 'डार्लिंग्स'या चित्रपटाची प्रथमच निर्मिती करत आहे. हा एक डार्क कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा मुंबईत राहणाऱ्या आई-मुलीच्या नात्याभोवती फिरते. शेफाली शाह या चित्रपटात आलिया भट्टच्या आईची भूमिका साकारणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sneha Wagh: आता मुंबई आपलीशी वाटत नाही...; यूपीतून परत आल्यावर अभिनेत्री स्नेहा वाघ असं का म्हणाली?

High cholesterol symptoms: डोळ्यापासून-पायांपर्यंत...! पाहा शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कोणत्या अवयवांमध्ये दिसतात लक्षणं?

Diwali Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजनात राशीनुसार करा हे खास उपाय, भरपूर पैसा अन् सुख- समृद्धी मिळेल

Fraud Case : शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचा व्यावसायिकाला १३ लाखांचा गंडा, फसवणुकीचा प्रकार उघड, नेमकं काय घडलं ?

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT