Riteish Deshmukh-Genelia D'Souza Saam TV
मनोरंजन बातम्या

Riteish Deshmukh-Genelia D'Souza : रितेश देशमुख-जेनेलियाचं सरप्राईज गिफ्ट; किंमत वाचून डोळे पडतील पांढरेफट्ट

सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या रितेश देशमुख-जेनेलिया या कपलने आता पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अभिनेता रितेश देशमुख(Ritesh Deshmukh) आणि पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूझा(Genelia D'Souza) हे बॉलिवूडच्या लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. सोशल मीडियावर हे कपल त्यांचे खास क्षण शेअर करत असतात. या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ काही तासांतच झपाट्याने व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या या कपलने आता पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

अभिनेता रितेश देशुमख आणि पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसुझा प्रत्येक सणांचा मनमुराद आंनद लुटताना पाहायला मिळतात. अनेकदा या दोघांचे रिल्स आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. या वर्षीचा गणेशोत्सव देखील रितेश आणि जेनेलियासाठी खूपच खास ठरला आहे. आंनदाची बातमी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशीही या स्टार कपलने नवीन आलिशान कार खरेदी केली आहे.

बॉलिवूडच्या या कपलच्या घरी BMW ix या न्यू इलेक्ट्रिक कारचे आगमन झाले आहे. दोघांनीही या कारची पूजा केली आहे. दरम्यान कारचे फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. यामुळे दोघांचे चाहतेही खूप आंनदी आहेत. सोशल मीडियावर रितेश आणि जेनेलियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

माहितीनुसार, इलेक्ट्रिक कारची किंमत १. १६ कोटी रूपये इतकी आहे. तर मुंबईत या कारची किंमत सुमारे १.४३ कोटी आहे. रितेशला कारचे प्रचंड वेड आहे. त्याच्याकडे अनेक लक्झरी गाड्यांचं कलेक्शन आहे. ही या कपलची दुसरी इलेक्ट्रिक कार आहे. याआधी त्यांनी लाल रंगाची टेस्ला मॉडल एक्स कार खरेदी केली आहे. यासह स्टार कपलकडे मर्सिडीज बेंजपासून रेंज रोव्हरपर्यंतच्या महागड्या कार आहेत.

स्टार कपल रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा त्याच्या नवीन रॉयल कारमधून अर्पिता खान आणि आयुष शर्माच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते. रितेश आणि जेनेलिया या दोघांनीही लाल रंगाच्या कारमधून एन्ट्री केली, तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. रितेश आणि जेनेलिया यांनी ११ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले. रितेश आणि जेनेलियाला रियान आणि राहिल अशी दोन मुले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

SCROLL FOR NEXT