Tharla Tar Mag  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tharla Tar Mag: प्रतिमा रविराज एकत्र येणार? 'ठरलं तर मग' मालिकेला मिळणार नवा ट्रॅक

Tharla Tar Mag Serial : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'ठरलं तर मग'.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tharla Tar Mag Serial Promo:

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'ठरलं तर मग'. जुई गडकरी आणि अमित भानुशाली मूख्य भूमिकेत असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेमध्ये रोज प्रेक्षकांना नवीन वळण पाहायला मिळत आहे. सायलीच्या अपघातानंतर मालिकेला एक वेगळेच वळण मिळाले आहे. मालिकेत रोज काही न काही घडत असतं.

नुकताच गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सायलीवर हल्ला झाला होता. त्यात ती जास्त जखमी सुद्धा झाली होती. त्यामुळे मालिकेत सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. तसेच मालिकेत सायलीची आई म्हणजे प्रतिमाची एन्ट्री झाली आहे.

मालिकेचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. यात हॉस्पिटलमध्ये एका बाजूला प्रतिमा तर एका बाजूला संपूर्ण देशमुख कुटुंब आणि रविराज किल्लेदार जाताना दिसत आहे. तर सायली ऑपरेशन थिएटरमध्ये असल्याचे दिसत आहे. अर्जुन सायलीला पाहण्यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये जातो. सायलीला पाहून अर्जुन खूप भावूक होतो.

मालिकेच्या मागील भागात सायलीवर हल्ला झाल्याने सर्वजण चिंतेत आहेत. त्यात सायलीला रक्ताची गरज असते. तिचा O+ रक्तगट मिळत नसतो. त्यामुळे तो चिंतेत असतो. अशातच कुसुमला रस्त्यात प्रतिमा भेटते आणि प्रतिमा सायलीला रक्त देते. त्यातही अनेक ट्विस्ट दाखवण्यात आले आहे. कुसुम आणि प्रतिमाची भेट होते. तेव्हा प्रतिमा हातवारे बोलत असते. त्यामुळे कुसुम तिला विचारते की, तुला बोलता येत नाही का? त्यावर ती मान हलवते. त्यावरुन तिला बोलता येत नसल्याचे कळते.

आता मालिकेत पुढील भागात प्रतिमा आणि रविराजची भेट होणार का? सायलीला बरं वाटणार का? सायलीच्या अपघाताचा अर्जुन सायलीच्या नात्यावर काय परिणाम होणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहेत. त्यामुळे आता मालिका कोणतं नवीन वळण घेणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी कशी करावी? जाणून घ्या आवश्यक स्टेप्स, वेबसाइट

Politics: भाजप गुन्हेगारांचे आश्रयस्थान, पक्षात जाऊन आमदार-मंत्री व्हायचं, ठाकरेंच्या खासदाराची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या आईंच्या भेटीला

Dombivali : डोंबिवली अंधारात, आठवडाभर सुरुय अघोषित भारनियमन, नागरिक त्रस्त | VIDEO

Sangeeta Bijlani: सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडच्या फार्महाऊसमध्ये चोरी; दरवाजा खिडक्या तोडून चोर घरात शिरल्याचा संशय

SCROLL FOR NEXT