Prajakta Dighe Bought New Car Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prajakta Dighe Bought New Car: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने खरेदी केली अलिशान कार; किंमत पाहून चक्रावून जाल

Prajakta Kulkarni Dighe News: दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्राजक्ता कुलकर्णी- दिघेने नवी कोरी अलिशान मर्सिडिज बेन्झ कार खरेदी केली आहे.

Chetan Bodke

Prajakta Dighe Bought New Car

‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून टीआरपी चार्टमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून या मालिकेचीच जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

मालिकेप्रमाणेच मालिकेतील कलाकारसुद्धा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत राहतात. मालिकेत कल्पना पात्र साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी- दिघे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या घरी एका नव्या सदस्याची एन्ट्री झाल्याचे सांगितले.

प्राजक्ता कुलकर्णी- दिघे कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्राजक्ता दिघेने नवी कोरी अलिशान मर्सिडिज बेन्झ कार खरेदी केली आहे. (Serial)

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्राजक्ता यांच्यासह त्यांच्या फॅमिलीच्या चेहऱ्यावर नवीन गाडी घेतल्याचा आनंद पाहायला मिळत आहे. ज्यावेळी त्यांनी नव्या कारचा तो पडदा काढला, त्यावेळी शोरुमच्या स्क्रीनवर त्यांच्या कुटुंबाचे फोटो आणि त्याचा एक सुंदर व्हिडीओ टिव्ही स्क्रीनवर चालू होता. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये कारची शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजाही करण्यात आलेली पाहायला मिळत आहे. (Social Media)

“नवीन सदस्याचं आमच्या घरी स्वागत आहे.” अशा आशयाचं कॅप्शन देत प्राजक्ता कुलकर्णी- दिघे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. तर आणखी एक व्हिडीओमध्ये, “आमच्या घरी बेबी तुझं स्वागत आहे.” अशा आशयाचं कॅप्शन दिले.

नवी कार खरेदी केल्याची व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर करताच त्यांच्यावर फक्त चाहत्यांनीच नाही तर, अनेक सेलिब्रिटी मित्रांनीही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्री सुकन्या मोने, जुई गडकरी, प्रियांका तेंडोलकर, पल्लवी वैद्य, मोनिका दबडे अशा अनेक कलाकारांनी प्राजक्ता कुलकर्णी- दिघे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Entretainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

SCROLL FOR NEXT