Tharala Tar Mag saam tv
मनोरंजन बातम्या

Tharala Tar Mag : लूक बदलले, जबाबदाऱ्या बदलल्या; अर्जुन-सायलीला नेमकं झालं तरी काय? 'ठरलं तर मग'मध्ये नवीन ट्विस्ट, पाहा VIDEO

Valentine Day Special-Arjun Sayali New Look : 'ठरलं तर मग' मालिकेत 'व्हॅलेंटाईन डे' स्पेशल एपिसोड पाहायला मिळणार आहे. अर्जुन-सायलीच्या भूमिका बदलणार आहे. मालिकेत नेमकं काय घडणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'ठरलं तर मग' मालिकेत नुकतीच नागराजला शिक्षा मिळते.

लवकरच साक्षीचे सत्य देखील अर्जुन-सायली समोर येणार आहे.

'व्हॅलेंटाईन डे' स्पेशलमध्ये अर्जुन-सायलीच्या भूमिका बदललेल्या पाहायला मिळणार आहे.

'ठरलं तर मग' मालिका सुरुवातीपासून प्रेक्षकांची आवडती आहे. या मालिकेत प्रत्येक आठवड्यात नवीन ट्विस्ट पाहायला मिळतात. अलिकडेच अर्जुन-सायली समोर नागराजचे खरे सत्य येते. दोघे मिळून नागराजला चांगलीच शिक्षा मिळवून देतात. पुरावे नसल्यामुळे नागराज रविराज-प्रतिमाच्या अपघाताच्या केसमधून सुटतो. मात्र सायली त्याला सुमनला केलेल्या छळ प्रकरणात जेलमध्ये पाठवते.

या सर्वात हळूहळू सायली आणि अर्जुनचे नाते बहरताना दिसत आहे. त्यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना खूपच आवडत आहे. अशात आता 'व्हॅलेंटाईन वीकला' सुरूवात झाली आहे. तर 'ठरलं तर मग' मालिकेतही मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अर्जुन-सायली एका नव्या रुपात आणि नव्या बदलात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याचा खास प्रोमो समोर आला आहे.

नवीन प्रोमो व्हिडीओमध्ये सायली आणि अर्जुनच्या लूकसोबत त्यांच्या जबाबदाऱ्या देखील बदललेल्या पाहायला मिळत आहे. सायली वकिलांच्या भूमिकेत सूट-बूट मध्ये दिसत आहे. हातात ऑफिसच्या फाइल्स आहेत. तर अर्जुनच्या हातात चमचा आणि गळ्यात किचन एप्रन, खांद्यावर गमछा घालून दिसत आहे. आता अर्जुन जेवण करणार तर सायली ऑफिसची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. व्हिडीओला कॅप्शन लिहिलं की, "भूमिका बदलणार पण प्रेम बहरत रहाणार..."

सायली-अर्जुन रुममध्ये बसून महत्त्वाच्या विषयावर बोलत असतात. तेवढ्यात कुकरची शिट्टी वाजते ते ऐकून सायली गॅस बंद करण्यासाठी जायला निघते. तेव्हा अर्जुन म्हणतो की, "मी इथे कामाचS बोलतोय आणि तुला कुकरच्या शिट्टीची पडली आहे..." यावर सायली बोलते, "तुमच्या ऑफिसच्या कामापेक्षा घरचे काम जास्त महत्त्वाचं आहे" यावर अर्जुन पुन्हा बोलतो, "तुला ऑफिसचे काम एवढं सोपं वाटतंय? मग होऊन जाऊ देत अदलाबदली..." 'ठरलं तर मग' मालिकेचा 'व्हॅलेंटाईन डे' स्पेशल एपिसोड 9 फेब्रुवारीपासून रात्री 8:30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पेणमधील 35 हजार गणेशमूर्ती परदेशी रवाना

Salman Khan : सलमान खानचं इन्स्टाग्राम अकाउंट अचानक Inactive का झालं? चाहते गोंधळात

Lata Pharande : महिला सरपंचाने केला मोठा घोटाळा, प्रशासनाकडून मोठी कारवाई, साताऱ्यात राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Rate Today: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याची चमक हरपली; बाजारभावात मोठी पडझड, जाणून घ्या 24k, 22k, 18k सोन्याचे दर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र? ₹१५०० बंद का झाले? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT