Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Box Office Collection : 'थामा'च्या कमाईत चौथ्या दिवशी मोठी घसरण; 'एक दीवाने की दीवानियत'नं किती कमावले? वाचा कलेक्शन

Thamma vs Ek Deewane ki Deewaniyat Collection : सध्या बॉक्स ऑफिसवर 'थामा' आणि 'एक दीवाने की दीवानियत' चित्रपट पाहायला मिळत आहे. रिलीजच्या चौथ्या दिवशी कोणी किती कमावले जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'थामा' आणि 'एक दीवाने की दीवानियत' दोन्ही चित्रपट 21 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाले आहेत.

'थामा' च्या कमाईत चौथ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे.

'थामा' चित्रपटातून पहिल्यांदाच रश्मिका मंदाना आणि आयुष्मान खुराना यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर म्युजिकल रोमँटिक ड्रामा आणि हॉरर-कॉमेडी-लव्ह स्टोरी एकमेकांना तगडी टक्कर देत आहे. आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) 'थामा' चित्रपट लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठेल. रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) 'थामा' (Thamma) आणि हर्षवर्धन राणेचा (Harshvardhan Rane) 'एक दीवाने की दीवानियत' (Ek Deewane ki Deewaniyat) चित्रपट 21 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. चित्रपटाचे एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.

'थामा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

'थामा' चित्रपटाने सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 3.79 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 59.39 कोटी रुपये झाले आहे. चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण झालेली पाहायला मिळत आहे.

  • दिवस पहिला- 24 कोटी रुपये

  • दिवस दुसरा- 18.6 कोटी रुपये

  • दिवस तिसरा- 13 कोटी रुपये

  • दिवस चौथा- 3.79 कोटी रुपये

  • एकूण - 59.39 कोटी रुपये

'एक दिवाने की दिवानियत' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाने सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 3.05 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 25.8 कोटी रुपये झाले आहे.

  • दिवस पहिला- 9 कोटी रुपये

  • दिवस दुसरा- 7.5 कोटी रुपये

  • दिवस तिसरा- 6 कोटी रुपये

  • दिवस चौथा- 3.05 कोटी रुपये

  • एकूण - 25.8 कोटी रुपये

'थामा' vs 'एक दीवाने की दीवानियत'

'थामा' चित्रपटात रश्मिका मंदाना, आयुष्मान खुरानासोबत नवाजुद्दीन सिद्दीकी सप्तमी गौड़ा, डायना पेंटी, वरुण धवन, संजय दत्त, अपारशक्ती खुराणा असे अनेक कलाकार आहेत. 'थामा' चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. 'एक दीवाने की दीवानियत' चित्रपटातून 'सनम तेरी कसम' फेम हर्षवर्धन राणे आणि अभिनेत्री सोनम बाजवा ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'एक दीवाने की दीवानियत' चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप जावेरी यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Make Puffed Poori: हॉटेलसारख्या फुगलेल्या आणि मऊ पुरी बनवायच्या? फॉलो करा 'या' ७ सोप्या टिप्स

Maharashtra Rain Alert : पुढील ५ दिवस महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार; अनेक जिल्ह्यांना अलर्ट

हॉटेलच्या रुममध्ये पांढऱ्या बेडशीटच का असतात, काळ्या रंगाच्या का नाही? कारण काय?

फक्त ‘अब्बा-अम्मा’ म्हणणाऱ्या बालकाला पोलिसांनी ९० मिनिटांत पोहोचवलं आई-वडिलांकडे

Sunday Horoscope : व्यवसायात लाभ होईल, 6 राशींच्या व्यक्तींचा रविवारचा दिवस कसा असणार? वाचा संपूर्ण राशीभविष्य

SCROLL FOR NEXT