Thalapathy Vijay Wife Saam Tv
मनोरंजन बातम्या

Thalapathy Vijay Wife: थलापती विजय आणि संगीता होणार वेगळे? घटस्फोट प्रकरणावर आज सुनावणी

Thalapathy Vijay Wife: तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजय आणि पत्नी संगीता यांच्या घटस्फोट प्रकरणाची सुनावणी आज आहे. समेटाच्या चर्चांमुळे प्रकरण चर्चेत आले असून न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shruti Vilas Kadam

Thalapathy Vijay Wife: तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि टीव्हीके (TVK) पक्षाचे अध्यक्ष थलापती विजय आणि त्यांची पत्नी संगीता स्वर्णलिंगम यांच्या घटस्फोट प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. चेंगळपट्टू कौटुंबिक न्यायालयात सोमवारी या प्रकरणाची सुनावणी होणार असून, अलीकडे सुरू झालेल्या समेटाच्या चर्चांमुळे या खटल्याबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.

संगीता यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी वैवाहिक नात्यातील मतभेद, मानसिक छळ आणि विवाहबाह्य संबंधांचे आरोप केल्याचे वृत्त आहे. त्यांनी विवाह संपुष्टात आणण्याबरोबरच पोटगी, तसेच चेन्नईतील नीलांकरई येथील घरात राहण्याचा अधिकार मागितला आहे.

यापूर्वी झालेल्या सुनावण्यांमध्ये विजय आणि संगीता हे दोघेही प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहिले नव्हते. त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते की, दोघेही सार्वजनिकरित्या महत्त्वाच्या व्यक्ती असल्याने प्रत्यक्ष उपस्थितीमुळे सुरक्षा आणि व्यवस्थापनाच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याची परवानगी मागण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जूनला केली होती.

दरम्यान, सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये विजय आणि संगीता यांच्यात समेट होण्याच्या शक्यतेबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. दोघांमध्ये पुन्हा संवाद सुरू असल्याचे दावे केले जात असले, तरी याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या प्रकरणाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे कारण विजय यांनी नुकतेच तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून ही त्यांची पहिली मोठी वैयक्तिक न्यायालयीन सुनावणी ठरणार आहे. ते न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणार की व्हर्च्युअल माध्यमातून सहभागी होणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Fennel Seeds Benefits: जेवणानंतर बडीशेप खाता? जाणून घ्या रोज बडीशेप खाण्याचे ७ आरोग्यदायी फायदे

Cabinet Meeting: अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत 10 टक्के आरक्षण; राज्य सरकारनं घेतले १० महत्त्वाचे निर्णय

आजोबा-पणजोबांची जमीन नक्की कुठे अन् किती आहे? एका क्लिकवर शोधा ७/१२ अन् जमिनीचा नकाशा

Maharashtra News Live Update: चाकणमधील कंपनीला भीषण आग

Honeymoon Destinations: डिसेंबरमध्ये हनिमूनचा प्लॅन करताय? ५ ड्रीम डेस्टिनेशन्स समोर परदेशही वाटेल फिका

SCROLL FOR NEXT