टॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी विजयकांत यांचे २८ डिसेंबरला निधन झाले. त्यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे अवघ्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आज विजयकांत यांच्यावर चेन्नईमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकारणी मंडळींसोबतच टॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. रजनीकांत, थलापथी विजयसह अनेक बड्या सेलिब्रिटींनी त्यांना निरोप देण्यासाठी उपस्थिती लावली होती.
सोबतच, चाहत्यांनीही अंत्यदर्शनसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. आज विजयकांत यांच्या अंत्यदर्शनावेळी एक विचित्र प्रकार घडला. प्रसिद्ध अभिनेता थलापति विजयच्या भोवती चाहत्यांनी गराडा घातला. (Tollywood)
त्याला चेंगराचेंगरीतून त्याच्या कारपर्यंत पोहोचावं लागलं. दरम्यान यावेळी एका अज्ञाताने विजयला चप्पल देखील फेकून मारली. या घटनेचा सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. (Social Media)
२९ डिसेंबर रोजी अभिनेता-राजकारणी विजयकांत यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी कोयंबेडू कार्यालयातून आयलँड ग्राऊंड अन्ना सलाई येथे आणण्यात आलं होतं. यावेळी लाडक्या अभिनेत्याचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी लाखोंचा चाहतावर्ग आला होता. सामान्यांपासून सेलिब्रिटींनीही विजयकांत यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. अभिनेते विजयकांत हे अनेक साऊथ कलाकरांसाठी इन्स्पिरेशन होते. त्यांच्या निधनाची माहिती कळताच सर्वांनाच धक्का बसला. कलाकार साश्रू नयनांनी त्यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी आले होते.
सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर)वर विजयकांत यांच्या अंत्यदर्शनादरम्यानचे अनेक व्हिडीओ फोटो व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये, विजयकांत यांचं अंत्यदर्शन घेऊन थलापति विजय बाहेर येताना दिसत आहे. त्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असूनही चाहते अंत्यदर्शनासाठी जाताना दिसत आहे. (Entertainment News)
विजय बाहेर येताच चारही बाजूंनी त्याला चाहत्यांनी गराडा घातलेला दिसत आहे. त्या गर्दीमध्ये अभिनेता अक्षरश: चेपून गेल्याचं दिसत आहे. तो खाली मान घालत त्याला त्याची पोलिस सेक्युरिटी कारपर्यंत नेण्यासाठी ढकलताना नेत असल्याचे दिसत आहे. याच दरम्यान, विजय त्याच्या कारकडे जात असताना, एका अज्ञाताने त्याच्या दिशेने चप्पल फेकून मारली. विजयला दिलेल्या या असन्मानजनक वागणूकीमुळे त्याचा चाहतावर्ग नाराज झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.