Tamil Superstar Divorce google
मनोरंजन बातम्या

Tamil Superstar Divorce: फिल्म इंडस्ट्रीमध्ये खळबळ; सुपरस्टार अभिनेत्याच्या आयुष्यात वादळ, २७ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट होणार

Thalapathy Vijay Divorce News: तमिळ सुपरस्टार थलापती विजय आणि पत्नी संगीता सोरनालिंगम यांच्या २७ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याला तडा गेला असून विशेष विवाह अधिनियमांतर्गत घटस्फोटाची याचिका दाखल झाल्याने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Sakshi Sunil Jadhav

तमिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार थलापती विजय नुकताच चाहत्यांच्या चर्चेत आला. हा अभिनेता या वेळी कोणत्याही चित्रपटाच्या निमित्ताने नाही तर त्याच्या वैवाहिक जीवनातल्या मोठ्या घटनेमुळे चर्चेत आला आहे. जवळपास २७ वर्षांच्या संसारानंतर त्याची बायको संगीता सोरनालिंगम हिने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. या बातमीमुळे तमिळ चित्रपटसृष्टीसह चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

अनेक कलाकारांच्या वारंवार घटस्फोटाच्या चर्चा कानावर येत असतात. त्यातच या बड्या आणि प्रसिद्ध कलाकाराची घटस्फोटाची बातमी म्हणजे चाहत्यांसाठी एक धक्काच होता. मिळालेल्या माहितीनुसार, विजय थलापतीची पत्नी संगीता हिने चेंगलपट्टू जवळच्या कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे.

१९९९ साली विजय आणि संगीता विवाहबंधनात अडकले होते. गेल्या दोन दशकांहून जास्त वेळ ते एकत्र होते. तमिळ इंडस्ट्रीतील स्थिर आणि आदर्श मानलं जाणारं हे कपल होतं. अभिनेता विजय यांने आपल्या कारकिर्दीत प्रचंड लोकप्रियता मिळवली, तर संगीता नेहमीच प्रकाशझोतातून दूर राहून कुटुंबाला प्राधान्य देताना पाहायला मिळाले.

गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा अधूनमधून समोर येत होत्या. २०२१ मध्ये विजय यांचे नाव एका अभिनेत्रीशी जोडले गेले होते, त्यामुळे सोशल मीडियावर विविध तर्क-वितर्कांना उधाण आलेलं. त्यावेळेस कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. आता मात्र संगीता यांनी अधिकृतपणे न्यायालयात धाव घेतल्याने या चर्चांना पुन्हा जोर आला आहे.

माहितीनुसार, विशेष विवाह अधिनियम १९५४ अंतर्गत कलम २७(१)(अ) अन्वये ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या कलमानुसार, पती किंवा पत्नीपैकी कोणालाही विवाहानंतर जोडीदाराव्यतिरिक्त इतर व्यक्तीसोबत स्वेच्छेने संबंध ठेवल्याच्या आधारावर घटस्फोटाची मागणी करता येते. हा तरतूद दोन्ही पक्षांना समानपणे लागू आहे. विजय सध्या त्यांच्या राजकीय पक्ष Tamilaga Vettri Kazhagam मुळेही चर्चेत आहेत. अशा वेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील या घडामोडीमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT