Marathi Bhasha Din History : लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी; मराठी भाषेचा इतिहास काय? कवी कुसुमाग्रजांविषयी ही माहिती प्रत्येकाने एकदा वाचाच

Sakshi Sunil Jadhav

२७ फेब्रुवारी

२७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात मराठी दिवस साजरा केला जातो. शाळा, महाविद्यालयांमध्ये अनेक कार्यक्रम केले जातात. याच दिवशी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो. त्यांच्याच स्मृतिप्रीत्यर्ख हा दिवस ‘जागतिक मराठी भाषा दिवस’ किंवा ‘मायबोली मराठी दिन’ म्हणून साजरा केला जातो.

Marathi Language History | google

कुसुमाग्रजांचा जन्म

२७ फेब्रुवारी हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन असतो. त्यांच्या साहित्यिक योगदानामुळे आणि मराठी भाषेच्या प्रेमापोटी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

Vishnu Vaman Shirwadkar

श्रेष्ठ कवींची ओळख

कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर आहे. ते कवी, नाटककार, कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत.

Marathi Bhasha Din | google

गाजलेली साहित्ये कोणती?

विशाखा, जीवनलहरी, वादळवेल हे काव्यसंग्रह हे काव्यसंग्रह आजही लोक मोठ्या आवडीने वाचतात. ‘नटसम्राट’, ‘राजमुकुट’ यांसारखी नाटके खूप गाजली. वैष्णव , जान्हवी या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. ‘नटसम्राट’ला १९७४ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला आहे.

Marathi Literature

मराठी सप्ताहाचे आयोजन

१९९९ पासून UNESCO ने २१ फेब्रुवारी हा ‘जागतिक मातृभाषा दिन’ घोषित केला आहे. त्यामुळे २१ ते २७ फेब्रुवारी दरम्यान ‘मराठी सप्ताह’ साजरा केला जातो. विशेषता शाळा कॉलेजमध्ये या दिवसात अनेक सोहळे साजरे केले जातात. maharashtra bhasha din

Maharashtra Language Day

मराठी भाषेची उत्पत्ती

मराठीचा उगम संस्कृतप्रभावित प्राकृत भाषेतील ‘महाराष्ट्रि’ बोलीतून झाल्याचे मानले जाते. पैठणच्या सातवाहन साम्राज्याने प्रशासनात महाराष्ट्रीचा वापर केला होता. देवगिरीच्या यादव काळात मराठी भाषा आणि संस्कृतीची मोठी भरभराट झाली.

maharashtra bhasha din

संत साहित्याची परंपरा

इ.स. १२९० मध्ये संत ज्ञानेश्वर यांनी ‘ज्ञानेश्वरी’ची रचना केली. संत एकनाथ, महानुभाव संप्रदाय यांनीही मराठी साहित्य समृद्ध केले होते. जे आजही शाळांमध्ये शिकवले जाते.

maharashtra bhasha din

मराठीला राजाश्रय

छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. पुढे पेशव्यांनी विस्तार केला आणि मराठीला राजाश्रय मिळाला. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठीला अधिकृत राजभाषेचा मान मिळाला.

maharashtra bhasha din

NEXT: Sparrow Behavior: चिमणी कोणतं अन्न खाते? ही माहिती वाचून बसेल धक्का

Sparrow favorite food
येथे क्लिक करा