Hruta Durgule Instagram @hruta12
मनोरंजन बातम्या

Kanni: छोट्या पडद्यावरील हिट दीपू-इंद्राची जोडी रुपेरी पडद्यावर, हृताने 'कन्नी'चे पोस्टर केले शेअर

हृताने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी १२ सप्टेंबरला 'कन्नी' या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: 'अनन्या', 'टाईमपास ३' चित्रपटातून तसेच त्याआधी 'दुर्वा, फुलपाखरु आणि मन उडू उडू झालंय' या सारख्या मालिकांमधून आणि चित्रपटातून हृताने प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. खूप कमी वेळात आणि चित्रपटसृष्टीतील काहीही आधार नसताना हृता इतकी लोकप्रिय झाली. हृताचा सोशल मिडीयावर (Hruta Social Media) लाखोंचा चाहतावर्ग असून तिला महाराष्ट्राची क्रश म्हणून ही ओळख निर्माण झाली आहे. ह्रताचा वाढदिवस १२ सप्टेंबर रोजी असतो.

हृताने अनन्या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हृताने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी १२ सप्टेंबरला 'कन्नी' या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटात दिग्दर्शनाची धुरा समीर जोशी यांनी संभाळली आहे. हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत मुख्य भूमिकेत असलेल्या जोडीचा चित्रपट २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याआधी ह्रता आणि अजिंक्य 'मन उडू उडू झालं' या मालिकेतून जोडी प्रेक्षकांच्या समोर आली होती.

हृता आणि अजिंक्यसोबतच शुभंकर तावडे, ऋषी मनोहर, वल्लरी विराज 'कन्नी' चित्रपटात दिसणार आहे. उंचच उंच आकाशात उडायचे असेल तर हवी मैत्रीची, प्रेमाची, जिद्दीची 'कन्नी' असे म्हणत हृताने 'कन्नी' सिनेमाचे पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या पोस्टवर चाहते कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.

आता हिच दिपू-इंद्राची जोडी मालिकेनंतर पुन्हा एकदा चित्रपटातून दिसणार आहे. रुपेरी पडद्यावर या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सिनेमाच्या कलरफुल पोस्टरने प्रेक्षकांची नक्कीच उत्सुकता वाढवली आहे.

Edited By- Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT