Satvya Mulichi Satavi Mulgi Latest Promo Instagram
मनोरंजन बातम्या

Satvya Mulichi Satavi Mulgi Latest Promo: अखेर रूपालीचं सत्य अव्दैतला कळणार!; ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत येणार नवे वळण, पाहा प्रोमो...

Satvya Mulichi Satavi Mulgi Latest Teaser: उत्कंठावर्धक कथानक आणि रोज मिळत असलेले मालिकेला वळण यामुळे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ची नेहमीच चर्चा होते. येत्या महाएपिसोडमध्ये रूपालीचं सत्य अव्दैतला कळणार आहे.

Chetan Bodke

Satvya Mulichi Satavi Mulgi Latest Promo

उत्कंठावर्धक कथानक आणि रोज मिळत असलेले मालिकेला वळण यामुळे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ची (Satvya Mulichi Satavi Mulgi) नेहमीच चर्चा होते. येत्या २४ डिसेंबरला प्रेक्षकांना मालिकेचा महाएपिसोड पाहायला मिळणार आहे. या महाएपिसोडच्या माध्यमातून रूपालीचं सत्य अव्दैतला कळणार आहे. या मालिकेने अल्पावधितच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मालिकेमध्ये प्रेक्षकांना आणखी एक ट्वीस्ट अनुभवता येणार आहे. प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण जवळ आला आहे. (Marathi Serial)

येत्या २४ तारखेला होणाऱ्या महाएपिसोडमध्ये रूपालीचं सत्य अव्दैतला कळणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नेत्राला जंगलामध्ये तिसरी पेटी मिळाली होती. त्या पेटीमध्ये असलेल्या सर्पलिपीचं रहस्य आता उलगडणार आहे. त्या लिपीचे लपवून ठेवलेलं रहस्य रूपालीला नागामुळे समजते. यावेळी रुपालीला ती विरोचक असल्याचेही समजते. आता मालिकेमध्ये रुपालीचं, अद्वैतचं आणि नेत्राचं कनेक्शन काय ? हे आपल्याला कळणार आहे. (Marathi Film)

नुकतंच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर टीझर शेअर करण्यात आला आहे. शेअर केलेल्या ह्या प्रोमोमध्ये, रुपालीपासून फक्त अद्वैतलाच नाही तर, सर्वांनाच धोका असल्याचं इंद्राणी टीझरमध्ये बोलताना दिसते. रुपालीला विरोचकाचं सत्य कसं काय कळतं ?, असा प्रश्न नेत्रा, इंद्राणी व शेखर यांना पडतो. येत्या रविवारी रूपालीचं खरं रूप नेत्रा, इंद्राणी आणि शेखर कसं समोर आणतात, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. हा एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. (Social Media)

मालिकेत गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता वाढवणारे एपिसोड पाहायला मिळत आहेत. मागील काही एपिसोडमध्ये सर्वात आधी अद्वैत विरोचक असल्याचे समजते. परंतु ते सर्व खोट असून खरी विरोचक रुपाली आहे. रुपालीला हे सत्य कळल्यावर ती काय करणार? रुपालीचे सत्य अद्वैतला कळणार का ?, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहेत. मात्र, आता येत्या महाएपिसोडमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार असल्याचे दिसत आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT