Premachi Goshta Serial Latest Update Instagram
मनोरंजन बातम्या

Mukta And Sagar Wedding Look: 'प्रेमाची गोष्ट'मध्ये रंगणार लग्नविशेष सोहळा, सागर- मुक्ताच्या पारंपारिक लूकने वेधले लक्ष

Premachi Goshta Serial Update: 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेमध्ये प्रेक्षकांना आजपासून सागर- मुक्ताचा लग्नविशेष सोहळा पाहायला मिळणार आहे.

Chetan Bodke

Premachi Goshta Serial Latest Update

'प्रेमाची गोष्ट' या मालिकेमध्ये प्रेक्षकांना आजपासून (२५ डिसेंबर) सागर- मुक्ताचा लग्नविशेष सोहळा पाहायला मिळणार आहे. या लग्नविशेष एपिसोडच्या सुरूवातीला काही मजेशीर सीन्स पाहायला मिळणार आहेत. माधवीने हळदीमध्ये नेमकं काय केलं ?, हे तिला आठवत नसते. मग ते तिला कशाप्रकारे आठवतं हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. २५ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान प्रेक्षकांना लग्नविशेष सोहळा पाहायला मिळणार आहे.

लग्नसोहळ्याला 'ठरलं तर मग' मालिकेतील अर्जुन-सायली या जोडीने हजेरी लावली आहे. मुक्ता-सागरच्या लग्नसोहळ्याचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेमध्ये त्यांच्या लग्नाची धुमधाम पाहायला मिळत आहे. दोघांचाही स्पेशल लूक, घरातल्यांनी हळदी समारंभामध्ये आणि मेहंदीमध्ये केलेली धमालमस्ती खूप चर्चेचा विषय ठरला आहे. आता मुक्ता आणि सागरच्या लग्नामध्ये वऱ्हाडी काय धुमाकूळ घालणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Social Media)

गोखले कुटुंबाच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न पार पडणार आहेत. तर लग्नामध्ये सागर-मुक्तासह सर्व वऱ्हाड्यांनी कोळी स्टाईलमध्ये लूक केलेला दिसत आहे. यावेळी वाजत गाजत, खास पेहरावामध्ये सागर आणि मुक्ता लग्नबंधनात अडकणार आहेत. मुक्ता आणि सागरच्या संगीत सोहळ्याला ‘स्टार प्रवाह’च्या परिवारातील अनेक सदस्य हजेरी लावताना दिसणार आहेत. (Tv Serial)

मुक्ता-सागरचा संगीत सोहळामध्ये, हळदीमध्ये आणि मेहंदीमध्ये जितके नाराजी नाट्य प्रेक्षकांनी पाहिले तितकेच नाराजी नाट्य प्रेक्षकांना लग्नातही पाहायला मिळणार का ?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. लग्न निर्विघ्न पार पडणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT