Mukta Ukhana Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Premachi Goshta Serial Update: मुक्ताने घेतला छोटुश्या सईसाठी हटके उखाणा, कोळी कुटुंबीयांमध्ये केला पारंपारिक पद्धतीने गृहप्रवेश

Mukta And Sagar Wedding Updates: कालच्या एपिसोडमध्ये मुक्ता आणि सागरचं अगदी पारंपारिक पद्धतीने लग्नसोहळा पार पडला. सोशल मीडियावर कोळी कुटुंबीयांच्या घरामध्ये पारंपारिक पद्धतीने गृहप्रवेश करताना तिने एक हटके उखाणा घेतला आहे.

Chetan Bodke

Mukta Ukhana Viral Video

सध्या स्टार प्रवाहावरील मालिकांची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. कायमच टीआरपी चार्टमध्ये अव्वल ठरलेली ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेचा नुकतेच १०० वा एपिसोड टेलिकास्ट झाला. नुकतंच कालच्या एपिसोडमध्ये मुक्ता आणि सागरचं अगदी पारंपारिक पद्धतीने लग्नसोहळा पार पडला. आजच्या एपिसोडमध्ये गोखले कुटुंबीय मुक्ताची पाठवणी करताना दिसणार आहे. यावेळी मुक्ताचे वडील कोळी कुटुंबीयांना काय सांगणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. (Tv Serial)

नुकताच ‘सिरीयल जत्रा’ या इन्स्टग्राम पेजवरुन मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, मुक्ताच्या वडीलांनी कोळी कुटुंबीयांना 'तुमच्या घरामध्ये आता मुक्ताचं हसणं आणि असणं या दोन्हीही गोष्टी आता तुमच्याच हातात आहे.' असं म्हणत त्यांनी आपल्या लाडक्या लेकीची पाठवणी केली आहे. यावेळी मुक्ताच्या माहेरची मंडळी भावूक होत तिची पाठवणी करताना दिसत आहेत. कोळी कुटुंबीयांच्या घरामध्ये प्रवेश करताना मुक्ताने खूप सुंदर उखाणा घेत सासरच्या मंडळींचे मन जिंकले आहे. सध्या तिच्या उखाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Serial)

“प्रेमळ माहेर, हौशी सासर, छोटुश्या सईचं प्रेम अमाप, सागरचं नाव घेते आणि कोळींच्या घरचं सुखाचं माप” असा मुक्ताने कोळी कुटुंबीयांच्या घरामध्ये गृहप्रवेश करताना उखाणा घेतला आहे. मुक्ता-सागरचा लग्नसोहळा अगदी धुमधडाक्यामध्ये पार पडला असून मुक्ताची पाठवणी करताना तिच्या आई-बाबांसह सगळेजण भावुक झाल्याचे पाहायला मिळणार आहे. आता लग्नानंतर मालिकेमध्ये मुक्ता-सागरच्या हनिमूनचा प्लॅन कोळी कुटुंबीय करताना दिसणार आहेत. त्यामुळे आता मुक्ता-सागर हनिमूनला नक्की कुठे जाणार? दोघांमधलं प्रेमाचं नातं आणखी कशापद्धतीने खुलणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. (Marathi Film)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून २,५०० जादा एसटी बस , ४०० गाड्या फुल

Success Story: युट्यूब आणि Google वरुन अभ्यास; क्रॅक केली स्पर्धा परीक्षा; पहाडिया समाजातील लेक होणार प्रशासकीय अधिकारी

Wednesday Horoscope : पार्टनरसाठी पैसा खर्च करावा लागणार; प्रेमात वाद होणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Saturn Jupiter yog: 48 तासांनंतर पलटणार 'या' राशींचं नशीब; शनी-गुरु तयार करणार शतांक योग, मिळणार फक्त पैसा

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

SCROLL FOR NEXT