Kiran Gaikwad And Asmita Deshmukh Photos Instagram
मनोरंजन बातम्या

Kiran- Asmita Relation Rumors: 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचा व्हॅलेंटाईन डे दणक्यात, अस्मिता देशमुखसोबत करणार खास सेलिब्रेशन

Kiran Gaikwad And Asmita Deshmukh News: मराठी सिनेसृष्टीमध्ये कायमच खलनायकाची भूमिका साकारणारा किरण गायकवाड सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

Chetan Bodke

Heart Majha Chorlay Sing Teaser Out

मराठी सिनेसृष्टीमध्ये कायमच खलनायकाची भूमिका साकारणारा किरण गायकवाड सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याने गेल्या काही दिवसांपूर्वी 'देवमाणूस' फेम अभिनेत्री अस्मिता देशमुखसोबत इन्स्टाग्रामवर एक रोमँटिक फोटो शेअर केला होता. तेव्हापासून त्यांच्या रिलेशनची सोशल मीडियावर चर्चा होत होती. पण आता दोघांनीही त्या पोस्टमागील सत्य प्रेक्षकांसमोर स्पष्ट केले आहे. अभिनेत्याने अवघ्या काही तासांपूर्वीच चाहत्यांसोबत व्हॅलेंटाईन स्पेशल गाण्याचा टीझर शेअर केला आहे. (Song)

या गाण्याच्या आधी दोघांनीही 'देवमाणूस' मालिकेमध्ये एकत्रित काम केले आहे. आता रूपेरी पडद्यावरील जोडी रियल लाईफमध्येही एकमेकांचे लाईफ पार्टनर होणार का ?, अशी चर्चा चाहत्यांमध्ये होत होती. नुकतंच अभिनेता किरण गायकवाडने सोशल मीडियावर गाण्याचा टीझर शेअर केला आहे. किरण आणि अस्मिताचं येत्या ८ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन स्पेशल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचं नाव 'हार्ट माझं चोरलंय' असं असून सध्या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. (Valentine Day)

सिने चित्र स्टुडिओने या गाण्याची निर्मिती केली असून एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट या गाण्याचे सादरकर्ते आहेत. प्रविण कुवरने हे गाणं गायलं असून प्रसाद गाढवेने हे गाणं शब्दबद्ध केलं आहे. या गाण्यामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये अस्मिता देशमुख आणि किरण गायकवाड असून यांची लव्हस्टोरी गाण्यामध्ये दाखवली. ज्यावेळी गाण्याची घोषणा करण्यात आली, त्यावेळी दोघांच्याही रिलेशनची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली होती. अनेकांनी तर डिंपल शेवटी डॉक्टरच्या प्रेमात पडली, अशी कमेंट केली होती. पण या दोघांचंही रिलेशन नसून दोघेही आगामी गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. (Marathi Actor)

दोघांच्याही कामाबद्दल सांगायचे तर, अस्मिता आणि किरण दोघेही 'देवमाणूस' आणि 'देवमाणूस २' सीरियलमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या मालिकेमध्ये हे दोघेही मुख्य भूमिकेत होते. अस्मिता देशमुखचे मालिकेत सागरिका पाटील म्हणजेच डिंपलचे पात्र होते. तर किरण गायकवाडचे मालिकेत एका डॉक्टरचे पात्र होते. या मालिकेमुळे किरण गायकवाड प्रचंड प्रकाशझोतात आला होता. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT