Urfi Javed share new look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Trolls: उर्फी जिन्सवरुन ट्रोल झाली खरी, पण एका कामगिरीमुळे होतोय तिच्यावर कौतुकाचा वर्षाव...

Urfi Javed Jeans Look: उर्फीने जीन्सला क्रिएटिव्ह ट्विस्ट दिला असून तो टॉप म्हणून परिधान केला आहे.

Chetan Bodke

Urfi Javed News: टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच आपल्या युनिक स्टाईलने सोशल मीडियात चर्चेत असते. कधी सिम कार्ड, झाडाचे पान, फुलं तर कधी आणखी काही गोष्टींनी बनलेले कपडे घालत ती शूट करते. नुकतेच उर्फीने आणखी एक नवा व्हिडिओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

उर्फीने नुकतेच डेनिम जीन्स टॉप म्हणून परिधान केली होती. उर्फीने यावेळी आणखी एक हटक्या पद्धतीने कपडे घालत युजर्सला आकर्षित केले आहे. उर्फीने जीन्सला क्रिएटिव्ह ट्विस्ट दिला असून तो टॉप म्हणून परिधान केला आहे. तिच्या कपड्यांबद्दल बोलताना उर्फी पापराझींना म्हणते, 'ऐन वेळी माझा टॉप खराब झाल्याने मला जिन्सचा टॉप करावा लागला.'

उर्फीने हा लूक परिधान करत जुहू येथील एका खास रेस्टॉरंटमध्ये गेली होती. त्यावेळी उर्फीला पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी एकच गर्दी केली होती. जुहूमध्ये स्पेशली एबल्ट मुलं कॅफे चालवतात. त्याच कॅफेमध्ये उर्फीने पापाराझींसाठी जेवणाची व्यवस्थाही केली होती.

उर्फीने स्पेशली एबल्ट मुलंच्या कॅफेला भेट दिल्याची माहिती स्वत: आपल्या सोशल मीडिया पेजवरुन दिली आहे. नेहमीच उर्फी नेटकऱ्यांच्या चर्चेस्थानी असते, पण तिची ही कामगिरी पाहून युजर्सने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

काही दिवसांपूर्वी, उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद बराच विकोपाला गेला होता. सध्या हा वाद बराच क्षमलेला आहे. नुकतेच तिने काही हटक्या पद्धतीतील कपड्यांतील व्हिडिओही शूट केले होते. ज्यात तिला नेटकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT