Sanaya Irani Recalls Casting Couch Incident Instagram
मनोरंजन बातम्या

Sanaya Irani : प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा प्रसंग, प्रसिद्ध दिग्दर्शकावर केले गंभीर आरोप

Sanaya Irani Recalls Casting Couch Incident : सनाया अभिनयापासून जरी दूर असली तरी ती कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सनायाने करियरबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Chetan Bodke

'इस प्यार को क्या नाम दूं' मालिकेतून टेलिव्हिजन अभिनेत्री सनाया इराणी प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेमध्ये सनायाने साकारलेल्या खुशी कुमारी गुप्ताच्या भूमिकेने सर्वांचेच निखळ मनोरंजन केले आहे. या मालिकेतील तिची भूमिका प्रचंड गाजली आहे.

अभिनेत्रीने अनेक प्रसिद्ध मालिकेंमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून टिव्ही इंडस्ट्रीपासून दूर आहे. सनाया अभिनयापासून जरी दूर असली तरी ती कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सनायाने करियरबद्दल मोठा खुलासा केला आहे.

सनायाने मुलाखतीत कास्टिंग काऊचबद्दल मोठा खुलासा केला आहे. सनायाने सांगितले की, बॉलिवूडच्या एका बड्या दिग्दर्शकाने तिला फोन करून तिच्यासोबत गैरवर्तन केले. सनाया म्हणाली, "काही दिवसांपूर्वी, टॉलिवूड इंडस्ट्रीतील एक व्यक्ती मला चित्रपटासाठी भेटणार होते. त्यावेळी मला चित्रपटात काम करायचे नव्हते. पण ती व्यक्ती मला भेटण्यासाठी आग्रह करत होती. त्यामुळे मी त्या व्यक्तीला भेटायला गेले होते."

"माझ्यासोबत बोलत असताना तो मला म्हणाला की, आम्हाला काम करणाऱ्या व्यक्तीची गरज आहे. मी थक्क होऊन 'म्हणजेच मी तशी व्यक्ती नाहीये.' असं म्हणाले." याशिवाय सनायाला एका निर्मात्याने मुख्य भूमिकेसाठी विचारलं होतं. सनाया म्हणाली, "मला सांगितलं होतं की, एका म्युझिक व्हिडिओसाठी ऑडिशन देत आहेस. पण तो एक चित्रपट आहे. मी माझ्या मॅनेजरला या कामासाठी नकार दिला होता. पण तो मला म्हणाला की, 'सर नाराज होतील. एकदा ते काय म्हणत आहेत ते ऐकून घे आणि त्यांना जाऊन भेट…' मी फोनच्या माध्यमातून त्यांना संपर्क साधला…"

सनायाने पुढे सांगितले की, "जेव्हा दिग्दर्शक माझ्यासोबत बोलला तेव्हा त्याने मला अर्ध्या तासानंतर फोन करायला सांगितला. अर्ध्या तासानंतर मी फोन केला तेव्हा तो म्हणाला, 'मी एक मोठा चित्रपट बनवत आहे. त्यात अनेक सेलिब्रिटीज आहेत. तुम्हाला बिकिनी घालावी लागेल.' त्याला मी माझ्या भूमिकेविषयी सुद्धा विचारले. तर त्याने मला सांगितले की, "तुला बिकिनी घालण्यात काही अडचण नाही ना?' नंतर तो माझ्यासोबत थोडा उद्धटपणे वागू लागला. मी रागाच्या भरात फोन ठेवून दिला."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

India Waterfall : धबधब्याचं पाणी चक्क आकाशाकडे जातं! भारतातच पाहायला मिळतो निसर्गाचा 'हा' अद्भुत चमत्कार

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगमध्ये दोन गटात तुफान दगडफेक

विकासकामांच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा? नगरसेविकेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

BJP Vs MNS : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं! सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली; काळेंची टीका, म्हात्रेंचा इशारा

SCROLL FOR NEXT