Maharashtrachi Hasyajatra Australia Daura Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali Video: 'जेव्हा वेडी माणसं एकत्र येतात!...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमची ऑस्ट्रेलियात धम्माल, शेअर केला भन्नाट व्हिडीओ

MHJ Team In Australia: महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचे कलाकार गेल्या काही दिवसांपूर्वी हास्यजत्रेची टीम दुबई दौऱ्याला गेली होती. आता त्यानंतर ही टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली आहे.

Chetan Bodke

Maharashtrachi Hasyajatra Australia Daura Video

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा प्रेक्षकांच्या आवडीचा शो आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील सगळेच कलाकार फक्त महाराष्ट्रातच नाही तर, जगभरामध्ये लोकप्रिय झाले आहेत. या कॉमेडी शोची प्रेक्षकांमध्ये खूप मोठी क्रेझ आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हास्यजत्रेची टीम दुबई दौऱ्याला गेली होती. आता ही टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. अवघी टीम परदेश दौऱ्याला गेली आहे, म्हटल्यावर कलाकार मंडळी जोरदार धम्माल मस्ती करीत आहे. सध्या हे कलाकार मंडळी धम्माल मस्ती करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Marathi Actress)

गेल्या काही दिवसांपूर्वी हास्यजत्रेची टीम दुबई दौऱ्यावर गेली होती. आता दुबईनंतर हास्यजत्रेची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये व्यग्र आहे. नुकतंच इन्स्टाग्रामवर हास्यजत्रा फेम आणि होस्ट प्राजक्ता माळी हिने एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्राजक्तासोबत हास्यजत्रेची टीमही डान्स आणि धम्माल मस्ती करताना दिसते. हा व्हिडीओ शेअर करताना प्राजक्ताने कॅप्शन दिले की, “जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये सर्व वेडे लोकं एकत्र येतात त्यावेळी... सचिन मोटे सर सुद्धा आमच्या मस्तीमध्ये सामील झाले याचा आम्हाला विशेष आनंद आहे.” (Tv Serial)

या व्हिडीओमध्ये, हास्यजत्रेचे लेखक सचिन मोटे, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, चेतना भट, समीर चौगुले, वनिता खरात, ओमकार राऊत हे कलाकार डान्स करताना दिसत आहेत. या सर्वांनी अपारशक्ती खुराना आणि निती मोहनच्या ‘कुडिये नी’ गाण्यावर जबरदस्त ठेका धरलेला दिसत आहे. हे स्टारकास्ट डान्स करताना त्यांच्या पाठीमागे शांत समुद्रकिनारा आणि आजूबाजूला नैसर्गिक सौंदर्य रिलमध्ये दिसत आहे. ऑस्ट्रेलियातल्या सिडनी आणि मेलबर्नमध्ये असलेल्या भारतीय प्रेक्षकांसाठी हास्यजत्रेची टीम खास लाईव्ह परफॉर्मन्स सादर करणार आहेत. सध्या हास्यजत्रेच्या टीमवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.  (Social Media)

सर्वच कलाकारांचा भन्नाट डान्स पाहून नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘मोटे सर अगदी जितेंद्र सारखाच डान्स करताय, मस्त’, ‘सगळेच वेडे आहेत, म्हणूनच ते टॉपला आहेत.’, ‘रोहित माने, गौरव मोरे कुठेय ?, मिस यू’, ‘प्राजक्ता तर वाऱ्यावरची वरात वाटतेय, खूप गोड...’, ‘MHJ जगभर आनंद आणि आनंद पसरवताना आणि ऑस्ट्रेलियाचा उत्तम दौरा पाहून आनंद झाला...’ अशा कमेंट्स चाहत्यांनी प्राजक्ताच्या डान्सवर केल्या आहेत. २८ हजारांहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला असून चाहत्यांनी मजेशीर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये ईद-ए-मिलाद निमित्त भव्य मिरवणूक

Ticket Collector: '...तर मी रोज प्रवास करेन', ट्रेनमधील हँडसम TC ला पाहून तरुणी पडली प्रेमात, VIDEO

Aadhaar Card: नागरिकांना सुप्रीम कोर्टाचा 'आधार'; नागरिकत्वाठी आधार कार्ड ग्राह्य धरा, निवडणूक आयोगाला आदेश

Nagpur Crime : एटीएममधून पैसे चोरीचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने अडकला, चोरटा पोलिसांच्या ताब्यात

Ananya Panday: अनन्या पांडेचा मीडियासमोर फोटो काढण्यास नकार, कारणही सांगितलं, म्हणाली- मी ५ वाजता उठले...

SCROLL FOR NEXT