Deepa Parab Tu Chal Pudh Serial Instagram
मनोरंजन बातम्या

Deepa Parab Special Post: दीपा परबची 'तु चाल पुढं'च्या वर्षपुर्तीनिमित्त विशेष पोस्ट; पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार

Deepa Parab News: झी मराठीवरील 'तु चाल पुढं' या मालिकेला नुकतच एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्त अभिनेत्री दीपा परबने सोशल मीडियावर विशेष पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

Deepa Parab Tu Chal Pudh Serial: झी मराठीवरील 'तु चाल पुढं' या मालिकेने खूप कमी वेळात प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'तु चाल पुढं' मालिकेतील अश्विनी म्हणजेच दीपा परबने पुन्हा मराठी मालिकाविश्वात पुनरागमन केलं आहे. मालिकेला नुकतच एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्त मालिकेतील प्रमुख अभिनेत्री दीपा परबने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

दीपा परबने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठीनंतर हिंदी आणि आता परत मराठी दीपाचा हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे.

'तु चाल पुढं' ही मालिका घराघरात पाहिली जाते. मालिकेतील अश्विनी हे पात्र प्रत्येक स्त्री स्वतः शी रिलेट करतं. दीपा नेहमीच सोशल मीडियावरुन काही न काही शेअर करत असते. दीपाने नुकतच मालिकेच्या वर्षपूर्ती निमित्त पोस्ट केली आहे.

दीपाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये दीपा कलशपुजन करताना दिसत आहे. लाल रंगाच्या नऊवारी साडीमध्ये दीपा खूप सुंदर दिसत आहे. दिपाने या व्हिडिओला कॅप्शन देत झी मराठीचे आभार मानले आहे.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन त्याचप्रमाणे आज झी मराठीचा वर्धापन दिन देखील आहे. माझ्यासाठी हा दिवस आणखीन एका गोष्टीसाठी खूप खास आहे कारण आज पासून एक वर्षापूर्वी १५ ऑगस्टलाच ‘तू चाल पुढं’ या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता दीपा, अश्विनी बनून एका नवीन रूपात तुम्हा सर्वांच्या भेटीस आली होती. खूप कमी वेळात तुम्ही सर्वांनी तिला 'तू चाल पुढं' म्हणत आपलंसं करून घेतलं.”

“आणि खऱ्या अर्थाने तिला दाही दिशांनी सुखाने साद घातली गेली. झी मराठीचा विश्वास, झी स्टुडिओचा पाठिंबा आणि तुम्हा सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांच्या भरभरून प्रेम आणि उदंड प्रतिसादामुळे अश्विनीचा स्वतंत्र होत स्वप्नांच्या दिशेने भरारी घेण्याचा प्रवास निर्विघ्नरित्या सुरू आहे. माझ्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवून 'अश्विनी' सारख्या एका खंबीर गृहिणीचे नेतृत्व छोट्या पडद्यावर साकारण्याची संधी मला दिली याबद्दल झी मराठी आणि झी स्टुडिओजचे मनःपूर्वक धन्यवाद. तुमचे हे प्रेम सदैव असेच पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.” असं कॅप्शन देत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

दीपाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, नुकतीच दीपा 'बाईपण भारी देवा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 'बाईपण भारी देवा' चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT