Ashvini Mahangade Emotional Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ashvini Mahangade: "बापमाणूस मिळायला भाग्य लागतं...."; अश्विनी महांगडे वडिलांच्या आठवणीत भावूक

Ashvini Mahangade Emotional Post : टेलिव्हिजन अभिनेत्री आश्विनी महांगडेने नुकतंच तिच्या वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

टेलिव्हिजन अभिनेत्री आश्विनी महांगडे आपल्या वैविध्यपुर्ण अभिनयासाठी ओळखली जाते. 'स्वराज्यरक्षक संभाजी' आणि 'आई कुठे काय करते' या दोन मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. आश्विनी कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अभिनेत्री नेहमीच आपल्या खासगी आयुष्यातील आठवणी शेअर करत असते. तिच्या सोशल मीडिया पोस्टची कायमच नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत असते. नुकतंच अभिनेत्रीने तिच्या वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

आज आश्विनी महांगडेच्या वडिलांचे तृतीय पुण्यस्मरण आहे. अभिनेत्रीने वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केलेली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये आश्विनी महांगडेने लिहिले की, "आज नानांचा तिसरा पुण्यस्मरणदीन... बघता बघता ३ वर्ष निघून गेली त्यांच्याशिवाय. बरेच आनंदाचे क्षण, दुःख, घेतलेल्या वस्तू, माझे पहिले घर हा सगळा त्यांच्याशिवाय करावा लागलेला प्रवास. पण या सगळ्यात माझ्या विचारात, माझ्यात ते कायम आहेत आणि राहतील. असा बापमाणूस मिळायला भाग्य लागतं. त्यांच्या शेवटच्या काही दिवसात त्यांनी आमच्यासाठी पाहिलेली स्वप्न मला सांगितली आणि ती मी नक्की पूर्ण करेन."

अभिनेत्रीने नुकतंच शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आश्विनी अनेकदा वेगवेगळ्या पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीही अभिनेत्रीने वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केलेली होती. त्यामध्ये तिने लाकूडतोड्याची म्हणजेच वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केलेली होती. तिने लाकडीच्या वखारीवरील काही फोटो शेअर करत आपल्या वडिलांच्या काही आठवणींना उजाळा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलचे दर वाढले की कमी झाले? वाचा तुमच्या शहरातील आजचे नवे भाव

Fasting Food : उपवासाला बनवा 'ही' खास स्मूदी, दीर्घकाळ पोट भरलेले राहील

Kitchen Hacks: घरगुती आले-लसूण पेस्ट ६ महिने ताजी ठेवायची? जाणून घ्या सोपी आणि स्मार्ट ट्रिक्स

आई-बाबा माफ करा! 'नीट'ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या, नागपूरमध्ये खळबळ

Horoscope Today : विनाकरण कटकटी मागे लागतील, अफवा उठतील, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT