Aishwarya And Avinash Narkar Shared Holi 2024 Dance Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aishwarya And Avinash Narkar Video: “बसं एवढं आयुष्यात...”; ऐश्वर्या- अविनाशचा धुलिवंदननिमित्त हटके डान्स, नेटकऱ्यांनी केले कौतुक

Aishwarya And Avinash Narkar Dance Video: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि तिचा पती, अभिनेता अविनाश नारकर यांनी एक खास डान्स करीत चाहत्यांना धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Chetan Bodke

Aishwarya And Avinash Narkar Shared Holi 2024 Dance Video

सध्या राज्यासह देशभरामध्ये धुलिवंदन सण (Dhulivandan Festival) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अगदी लहाणांपासून ते थोऱ्या मोठ्यापर्यंत सर्वच एकत्र येत सण साजरा करीत आहेत.

सध्या अनेक सेलिब्रिटी होळी सण (Holi Festival) दणक्यात साजरा करताना दिसत आहे. नुकताच इन्स्टाग्रामवर मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि तिचा पती, अभिनेता अविनाश नारकर (Avinash Narkar) यांनी एक खास डान्स करीत चाहत्यांना धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. (Marathi Actress)

ऐश्वर्या नारकर कायमच सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे आणि हटक्या रिल्समुळे ती चाहत्यांमध्ये चर्चेत असते. (Social Media) अनेकदा अभिनेत्री आणि तिचा पती, अभिनेते अविनाश नारकर अनेकदा आपल्या रिल्समुळे चर्चेत असतात. अशातच अभिनेत्रीने सोशल मीडियावर रिल शेअर चाहत्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. ऐश्वर्या आणि अविनाश दोघेही एकमेकांना होळीचा रंग लावत डान्स करताना दिसत आहे. (Viral Video)

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर एकमेकांना रंग लावत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. ऐश्वर्या आणि अविनाश हे दोघेही रितेश- जिनिलीयाच्या ‘लयभारी’ या लोकप्रिय चित्रपटातल्या ‘धुवून टाक’ गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहेत. अवघ्या सेकंदाचा हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड भावला असून कलाकार मंडळींसह चाहत्यांनी ऐश्वर्या आणि अविनाश यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“कमाल”, “होळीच्या शुभेच्छा”, “मस्तंच”, “बसं एवढं आयुष्यात एन्जॉय करता आलं पाहिजे,” अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी नारकर कपलच्या ह्या व्हिडीओवर दिलेल्या आहेत. अवघ्या दोन तासांमध्ये या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळालेल्या असून लाखो व्ह्यूज मिळालेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT