Famous Actress  saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actress : शिवीगाळ अन् चारित्र्यावर संशय; प्रसिद्ध अभिनेत्रीचे पतीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप, गुन्हा दाखल

Actress Filed Domestic Violence Case Against Husband : टिव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने पती आणि सासरच्या मंडळींवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करून गुन्हा दाखल केला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या संसारत अडचणी

लग्नाच्या २ वर्षांतच नवऱ्यासोबत उडाले खटके

पती आणि सासरच्या मंडळींवर केला घरगुती हिंसाचाराचा आरोप

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री अदिती शर्मा (Aditi Sharma) ने ३० जुलै रोजी पती, सासू आणि नणंदेविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. ज्यामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. अदिती शर्माने आजवर 'अपोलीना - सपनों की ऊंची उड़ान', 'रब्ब से है दुआ' आणि 'कलीरें' यांसारख्या मालिका गाजवल्या आहेत. अदिती टिव्हीचा प्रसिद्ध चेहरा आहे.

TOI च्या वृत्तानुसार, अदिती शर्माच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला. यात आरोप करण्यात आला आहे की, पती, सासू आणि नणंदेने अभिनेत्रीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला, तसेच घरगुती हिंसाचार, मारहाण, शाब्दिक गैरवर्तन, चारित्र्यावर संशय घेणे आणि तिच्या 'स्त्रीधनाचा' (लग्नातील दागिने) गैरवापर करणे यांसारखे प्रकार तिच्यासोबत घडले आहेत. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.

या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३(५) (समान उद्देश), ३१६(२) (विश्वासभंग), ३५२ (जाणीवपूर्वक अपमान) आणि ८५ (विवाहित महिलेचा पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून होणारा छळ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव पोलीस अधिकाऱ्याने एफआयआर दाखल झाल्याची पुष्टी केली. तक्रारीत अदिती शर्माने म्हटले की, "जून २०२१ मध्ये ऑनलाइन अभिनयाच्या क्लास दरम्यान तिची पतीशी भेट झाली. आम्ही मित्र बनलो आणि नंतर आमच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सप्टेंबर २०२४ पासून, आम्ही दोघे गोरेगावमधील एका भाड्याच्या घरात 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहत होतो. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने, १२ नोव्हेंबर २०२४ रोजी गोरेगावमधील माझ्या कुटुंबाच्या मालकीच्या एका भाड्याच्या घरात आमचा विवाह झाला. या लग्नाचा किरकोळ खर्च आम्ही दोघांनी केला. लग्नानंतर दोन-तीन दिवसांनी माझे आई-वडील दिल्लीला परतले. त्यावेळी माझी सासू आणि नणंद माझ्यासोबत होत्या."

अदिती शर्माने पुढे नमूद केले की, "लग्नानंतर माझे पती माझ्या कपड्यांवरून टीका करायचे. घरगुती किरकोळ कारणांवरून ते माझ्याशी भांडणही करायचे. घरखर्चासाठी ते मला पैसे देत नसत; उलट, ते माझ्याकडूनच पैसे घ्यायचे. १ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ते कॉफी पीत असताना एका घरगुती मुद्द्यावरून माझ्याशी वाद घालू लागले आणि मला शिवीगाळ करत म्हणाले, 'तू आता माझी पत्नी राहणार नाहीस . माझे पती मला अश्लील शिव्या द्यायचे आणि माझे बाहेर दुसऱ्या पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करायचे. त्यांनी माझ्याशी बोलणे बंद केले होते. ते दुसऱ्या खोलीत झोपायचे आणि अधूनमधून मला टोमणे मारून पुन्हा आपल्या खोलीत निघून जायचे, ज्यामुळे मला मानसिक त्रास झाला..."

तसेच पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडणे सोडवायला आलेल्या सासू आणि नणंदेनेही अभिनेत्रीचा छळ केला. अभिनेत्रीने तक्रारीत म्हटले की, "त्यांनी तक्रार केली की वाद मिटवण्याऐवजी त्या महिला तिला सतत टोमणे मारत असत, ज्यामुळे तिला मानसिक त्रास झाला. सासरच्यांनी माझे लग्नातील दागिने दोन सोन्याच्या साखळ्या, चार सोन्याच्या अंगठ्या, एक हिऱ्याची अंगठी, सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याच्या दोन बांगड्या घेऊन ठेवले. त्यानंतर, पतीने माझा मोबाईल तपासला. "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism : पावसाळ्यात धबधबा पाहण्याचा आनंद काही औरच! पुण्यात लपलाय 'हा' निसर्गाचा अद्भुत चमत्कार

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची विशेष सुनावणी

Train Fire : स्टेशनवर ट्रेन पोहोचताच इंजिनला भीषण आग, डब्यांमध्ये पसरला धूर; प्रवाशांनी खिडक्या-दारातून मारल्या उड्या

Chocolate Ball Cake: लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी चॉकलेट बॉल केक; वाचा सोपी रेसिपी

Weekly Horoscope: या आठवड्यात कोणाच्या नशिबात धनलाभ, कोणाला करिअरमध्ये मोठी संधी? तुमची रास काय सांगते ते आत्ताच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT