Milind Gawali On Lok Sabha Election 2024
‘आई कुठे काय करते’ मालिकेने प्रेक्षकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवली आहे. मालिकेप्रमाणेच मालिकेतले कलाकारही कायमच इन्स्टाग्रामवर चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. मालिकेतील अनिरूद्ध पात्र साकारणारा मिलिंद गवळी कायमच इन्स्टाग्रामवर चर्चेत असतो. नुकतंच अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलेली आहे. त्या पोस्टमध्ये अभिनेत्याने सर्वांनाच आपला मतदानाचा हक्क बजवण्याचा आवाहन केले आहे. सध्या सर्वत्र देशभरामध्ये निवडणूकीची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच अभिनेत्याची ही इन्स्टाग्राम पोस्ट कमालीची चर्चेत आली आहे. (Marathi Actors)
मिलिंद गवळी आपल्या पोस्टमध्ये लिहितात, "Let’s Vote जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतात आहे, पण मतदानाचा अधिकार खूप कमी लोक वापरतात. मतदान करण्यासाठी बऱ्याच लोकांना सुट्टी दिली जाते, पण तरीसुद्धा ते मतदान करत नाहीत. आपल्या मतदारसंघात नको तो उमेदवार आहे!, आपला उमेदवार निवडून येणारच आहे. मग आपण कशाला मतदान करा! सगळेच उमेदवार भ्रष्ट असतात! म्हणून आपण मतदान करायचं नाही. एक न अनेक कारणे दिली जातात, सुट्टी असल्याने आपल्या फॅमिली बरोबर किंवा मित्रमंडळींबरोबर बाहेर कुठेतरी निघून जातात, मग ३५% ५५% टक्के मतदान होतं आणि एखादा उमेदवार निवडून येतो मग पाच वर्षे त्याच्या नावाने बोंबा मारत बसतात." (Televesion Actors)
मिलिंद गवळी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहितात, मला वाटतं मतदान करणं कम्पल्सरी करायला हवं. कमीत कमी ९० ते ९५ टक्के मतदान व्हायलाच हवं, पण मग त्या साठी जसा काळ बदललाय तसं मतदान करण्याची पद्धत ही बदलायला हवी, घरबसल्या आपण अनेक पैशांचे व्यवहार करतो. रेल्वे बसचे तिकिटांचा आरक्षण करतो, विमानाचे तिकिटाचा आरक्षण करतो, यासाठी रांगेत उभे राहावे लागत नाही, वेळ वाचतो, त्यासाठी सुट्टी घ्यायची गरज लागत नाही, आपण दहा बिल घरबसल्या भरू शकतो, मतदान का नाही करू शकत? तो जर भारतीय नागरिक असेल तर जगाच्या कुठल्याही टोकात बसून त्याला मतदान करायचा अधिकार मिळाला हवा, कुठल्याही भारताच्या राज्यातून मतदान करता यायला हवं. प्रवास करून त्या त्या भागात जायची गरज नाहीये, आजरी माणसांना हॉस्पिटलमध्यून पण मतदान करायला यायला हवं, म्हातारी माणसं, अपंग यांना त्यांचा मतदानाचा अधिकार सोप्या पद्धतीने करायला मिळायला हवा. (Lok Sabha Election)
मतदान करणाऱ्याला सवलती मिळायला हव्या, न करणाऱ्याला दंड नाही पण एखाद्या सवलतीतून त्याला वगळायला हवं, टॅक्स म्हणा, टोल म्हणा, शाळा कॉलेजेस ॲडमिशन, काहीही ज्याच्याने मतदान करणारा किंवा मतदान न करणारा यामध्ये फरक जाणवला पाहिजे, पण हे सगळं व्हायला थोडा वेळ लागणार आहे, भविष्य काळामध्ये हे सगळं होणारच आहे. पण तूर्तास, पूर्वी आपण जसे रेल्वे स्थानकावर, विज बिल भरायला किंवा एखाद्या बँकेत रांगेत उभे राहायचो, थोडा त्रास थोडी धावपळ सहन करायचो, तसा थोडा त्रास आपल्या देशासाठी करायला काहीच हरकत नाही, चला मतदान करूया, योग्य माणसांच्या हातात देशाला सोपवूया , मतदान करणं ही आपली जबाबदारी आहे, ती प्रामाणिकपणे पार पाडूयात. Will You ? (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.