Kiran Mane On SRK Jawan Film Facebook
मनोरंजन बातम्या

Kiran Mane On SRK Jawan Film: ‘पिच्चर आल्यावर काय हुईल शारख्या? तू हायेसच...’; किरण मानेची ‘किंग खान’साठी खास शैलीत पोस्ट

Kiran Mane Post: ‘जवान’ची भूरळ साताऱ्याच्या बच्चनला ही पडली आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून थेट किंग खानसाठीच किरण मानेनी पोस्ट लिहिली आहे.

Chetan Bodke

Kiran Mane On SRK Jawan Film

टेलिव्हिजन अभिनेता किरण मानेंची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होते. किरण माने कायमच सोशल मीडियावर अनेक विविध विषयांवर आपले परखड मत मांडण्याचा प्रयत्न करतात. गेल्या काही दिवसांपूर्वी किरणने सोशल मीडियावर एक मीम शेअर केली होती. त्यामुळे अभिनेता प्रचंड चर्चेत आला होता. अशातच सध्या किरण माने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी शाहरूख खानच्या ‘जवान’ चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची क्रेझ फक्त चाहत्यांमध्येच नाही तर, अनेक कलाकारांमध्येही पाहायला मिळत आहे. अशातच चित्रपटाची क्रेझ साताऱ्याचा बच्चन म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या किरण मानेला ही या चित्रपटाची भूरळ पडली.

गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ कायम पाहायला मिळत आहे. अशातच किरण मानेने किंग खानसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये किरणने शाहरूखच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक केलं आहे. किरण माने शाहरूखबद्दल आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, “बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर ! अग्ग्गाय्यायायाया... अख्ख्या देशानं घरात बसल्या-बसल्या शिट्ट्या वाजवल्यात भावा ! पिच्चर आल्यावर काय हुईल शारख्या? तू हायेसच भन्नाट,जबराट,नादखुळा. ...तुझ्यावर जळनार्‍यांनी लै अफवा पसरवल्या दोस्ता, पन तू मागं हटला नाहीस. ...ट्रोलर्सच्या झुंडीनं तुला लै ट्रोल केला, लै हेटाळनी केली, पन तू भिडलास, नडलास, जिंकलास.”

किरण माने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतो, “...तुझ्या पोराला अडकवून तुला झुकवन्याचा प्रयत्न झाला, पन तू तर ‘बाजीगर’ ! गप र्‍हावून बाजी पलटलीस. परत ताठ कण्यानं, उंच मानेनं उभा र्‍हायलास. भक्कम. पाय रोवून. तुझी ती 'क़ातिल' नजर रोखून. आजबी तुझ्या ‘मन्नत’पुढं रोज अख्ख्या भारतातनं तरूण पोरंपोरी येऊन उभी र्‍हात्यात... तासनतास तुझ्या घराकडं बघत बसत्यात... त्यांना तुझ्या जातीधर्माशी घेनंदेनं नसतं. कारन ते तुझ्यासारखेच 'अस्सल' भारतीय असत्यात. तुझी एक झलक दिसली तर आनंदानं नाचायला लागत्यात...येडी होत्यात. जगातला सगळ्यात लोकप्रिय कलाकार हायेस तू.” (Actors)

आपल्या पोस्टच्या शेवटच्या भागात किरण माने म्हणतो, “तू फक्त अभिनयातला बादशाह नाहीस, तर 'मानूस' म्हनूनबी तू 'किंग' हायेस ! ॲसिड ॲटॅक झालेल्या हजारो महिलांची आयुष्य उभी करून दिलीयस तू. नानावटी हाॅस्पीटलमध्ये लहान मुलांच्या कॅन्सरसाठी तू जो वाॅर्ड उभा केलायस त्यानं कित्येक चिमुरड्यांचे जीव वाचवलेत. तुझ्या अशा लै लै लै समाजोपयोगी कामांची जगभर दखल घेतली गेली हाय. युनेस्को अवाॅर्ड मिळवलंयस.” (Marathi Film)

“साऊथ कोरीयापास्नं इंग्लंडपर्यन्त अनेक देशांनी यासाठी तुला सन्मानित केलंय. त्यासाठी या देशातल्या प्रत्येक सच्च्या नागरीकाला तुझा अभिमान वाटतो ! 'पठान'च्या वेळी याच आपल्या खर्‍या देशानं दाखवून दिलं की, थयथयाट करत सेलिब्रिटींना शिवीगाळ करणार्‍या छितपूट ट्रोलर्सच्या पलीकडं, बहुसंख्य जनता आहे जी शांत असते, पन मानवतेच्या प्रसारासाठी निधड्या छातीनं लढनार्‍यांच्या पाठीशी भक्कम उभी असते.”

“पठान सिनेमा म्हनून लै बरा नव्हता. तुझ्या ट्रोल्सना सनसनीत उत्तर म्हनून पब्लीकनं डोक्यावर घेतला. द ग्रेट, वन ॲन्ड ओन्ली शाहरूख खान, आता तुझा 'जवान' मात्र लै भारी असनार. लै आतुरतेनं वाट बघतोय. ये लवकर भावा... होऊ दे जाळ न् धूर संगट... चिखलात धुरळा, पान्यात आग काढ... आम्ही आहोत तुझ्यासोबत. बघनार. 'पठाण'सारखा परत परत बघनार. लब्यू भावा.” (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT