Kiran Mane In Sindhutai Majhi Mai Instagram
मनोरंजन बातम्या

Kiran Mane: '...म्हणून ती हजारो अनाथांची माय होऊच शकली'; किरण मानेची बापाच्या हळव्या मनाला साद घालणारी पोस्ट चर्चेत

Chetan Bodke

Kiran Mane In Sindhutai Majhi Mai

टेलिव्हिजन अभिनेता किरण माने कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. किरण मानेंबद्दल सांगायचे तर, ते कायमच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. 'बिग बॉस मराठी ४'नंतर 'सिंधुताई माझी माई' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिका १५ ऑगस्टपासून कलर्स मराठीवर प्रदर्शित होत असून सध्या सर्वत्र मालिकेची चर्चा सुरू आहे. मालिकेमध्ये सिंधुताईंच्या वडीलांची भूमिका साकारली आहे. सध्या किरण मानेंनी एक नवी पोस्ट शेअर केली आहे, त्या पोस्टमध्ये किरण मानेंनी एका बापाच्या हळव्या मनाला मालिकेत साद घातली आहे ही भुमिका साकारतानाचा विलक्षण अनुभव अभिनेत्याने पोस्टमध्ये शेअर केलीय.

किरण माने आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, " पं. सत्यदेव दूबेजी एकदा म्हणाले होते, "अभिनयातला एक भाव असा आहे, जो पुरूष कलावंतांना व्यक्त करणं फार अवघड असतं. स्त्री कलावंतांसाठी ते अगदीच सोपं असतं. तो म्हणजे 'वात्सल्य' भाव! पोटच्या लेकराविषयीचं ममत्व."

"ते बोलल्याक्षणी मी ते डायरीत लिहीलं होतं. हिंदी सिनेमात पुरूष कलावंतांनी उत्कटपणे आणि उत्कृष्टपणे दाखवलेल्या वात्सल्यभावाची दोन उदाहरणंही दूबेजींनी दिली होती. एक 'नाजायज़' सिनेमातल्या "अभि जिंदा हूॅं तो जिने लेने दो" या गाण्यातलं... नसिरूद्दीन शाह आपल्या मुलाला, अजय देवगणला पहाण्यासाठी रस्त्यावरच्या भिकार्‍यांसोबत गाणे गात-गात त्याच्या घरासमोर जातो... आणि डोक्यावर घोंगडे पांघरुन त्याला लपून पहातो तो क्षण... आणि दुसरा प्रसंग 'पापा कहते है' सिनेमात टिकू तलसानियानं मुलीच्या बिदाईच्या वेळी साकारलेला !"

पोस्टच्या पुढच्या भागात किरण माने म्हणतात, "असा पुरूष कलावंतांना दुर्लभ असलेला 'वात्सल्यभाव' भरभरून दाखवायची संधी मला 'सिंधुताई... माझी माई' मालिकेनं दिलीय. अभिमान साठे हा जगावेगळ्या पोरीचा जगावेगळा बाप साकारताना रोज मन भरून येतं... रोज डोळे पाणावतात... मुलीतलं टॅलेन्ट ओळखून तिला शिकायला मिळावं, तिनं मोठं व्हावं म्हणून, सगळ्या संकटांशी विलक्षण ताकदीनं लढलाय हा माणूस ! जन्मापासून स्वत:च्या आईसकट संपूर्ण घरानं नाकारलेल्या चिंधीवर मायेचा अमाप वर्षाव करणारा 'बाप'माणूस तिला लाभला म्हणून तर नंतरच्या काळात ती हजारो अनाथांची माय होऊच शकली."

पोस्टच्या शेवटच्या भागात किरण माने म्हणतात, "...रंगभुमी आणि टी.व्ही.नं मला कायम अविस्मरणीय भुमिका दिल्या. टीव्हीनं तर घराघरात पोहोचवलं. लोकप्रियता दिली. ते दान घेताना कुठेही कमी पडू नये याची काळजी मी मनापासून घेतोय... तुम्ही, माझ्या चाहत्यांनीही माझ्या सगळ्या कलाकृतींना कायम उच्चांकी टीआरपी दिलाय. ही तर प्रेमाचा, मायेचा, वात्सल्याचा संदेश घेऊन आलेली मालिका आहे. हिच्यावर तुम्ही मनापासून प्रेम कराल याची खात्री आहे. न हारा है 'इश्क़' और न दुनिया थकी है...दिया जल रहा है, हवा चल रही है !"

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT